नंदुरबारच्या अनिलकडून युरोपातील ‘माउंट एल्ब्रूस’ सर
माउंट एल्ब्रूसमाउंट एल्ब्रूस

नंदुरबारच्या अनिलकडून युरोपातील ‘माउंट एल्ब्रूस’ सर

नंदुरबारच्या अनिलकडून युरोपातील ‘माउंट एल्ब्रूस’ सर

नंदुरबार : युरोपातील सर्वोच्च शिखर असलेले माउंट एल्ब्रूस नंदुरबारच्या अनिल वसावे याने यशस्वीरीत्या सर करत युरोपात भारताचे नाव मोठे करत इतिहास घडवला आहे. अशी कामगिरी करणारा अनिल हा राज्यातील पहिला आदिवासी गिर्यारोहक बनला आहे. गुरुवारी (ता. ८) पहाटे त्याने ही कामगिरी पार पडली. ‘३६० एक्सप्लोरर’ टीममार्फत महाराष्ट्रातील नंदुरबार येथील अनिल वसावे यांचा या टीममध्ये समावेश आहे. कोरोनानंतरची ही पहिलीच भारतीय मोहीम असून, एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे. अनिल वसावे याने शिखरावर भारतीय संविधानाची प्रतिमा नेऊन आगळावेगळा विक्रम केला. (Mount-Elbrus-from-Europe-by-Anil-wasave-from-Nandurbar)

३६० एक्सप्लोरर टीम २ जुलैला या मोहिमेसाठी निघाली होती. कोरोनानंतरच्या पहिल्या भारतीय मोहिमेस आमदार सुनील शेळके व ज्येष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांच्या हस्ते ‘फ्‍लॅग ऑफ’ करण्यात आला होता. ही टीम विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूस सर करण्यासाठी निघाली होती. हे शिखर सर करताना अनिल वसावे याने सोबत भारतीय संविधानाची प्रतिमा व तिरंगाही नेला होता. मध्यरात्री त्याने हे शिखर सर करून तेथे संविधानाची प्रतिमा ठेवून तिरंगा फडकविला. वसावे यांची ही दुसरी मोहीम आहे.

माउंट एल्ब्रूसची माहिती

माउंट एल्ब्रूस युरोपमधील सर्वोच्च शिखर असून, या शिखराची उंची १८ हजार ५१० फूट आहे. काळा समुद्र ब कॅस्पियन समुद्राच्या मध्ये हे शिखर वसले आहे. जॉर्जिया देशाच्या सीमेपासून २० किलोमीटरवर माउंट एल्ब्रूस शिखर असून, पृथ्वीवरील सर्वांत उंच असलेल्यांपैकी एक असा हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे २५ डिग्रीपर्यंत जात असते. वर्षभर येणारी सततची सुरू असलेली मोठमोठी वादळे, हाडे गोठवणारी थंडी इ. माउंट अल्ब्रूस चढाईतील अडचणी आहेत.

माउंट एल्ब्रूस
त्‍या घटनेने अंध वडीलांचा आधार हिरावला; बंधाऱ्यात बैलगाडी उलटली

३६० एक्सप्लोरर

३६० एक्सप्लोरर या ग्रुपतर्फे जगभर साहसी मोहिमा होतात. ३६० एक्सप्लोररच्या नावे पाच वर्षांत अनेक विश्वविक्रम झाले आहेत. अतिशय अवघड व आव्हानात्मक मोहिमांचे योग्य नियोजन करण्यात ३६० एक्सप्लोररचा हातखंडा असून, (DPIIT) भारत सरकारमार्फत ‘युनिक स्टार्ट-अप’चे नामांकनही या कंपनीला मिळाले आहे.

३६० एक्सप्लोरर मार्फत ही युरोप खंडातील सर्वोच्च शिखरांची मोहीम जगभरातील कोविड योद्ध्यांना समर्पित करण्यात आली आहे.

-अनिल वसावे, गिर्यारोहक, नंदुरबार

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com