कोवीड लसीकरणात राज्यात नंदुरबार जिल्हा शेवटचा

कोवीड लसीकरणात राज्यात नंदुरबार जिल्हा शेवटचा
कोवीड लसीकरणात राज्यात नंदुरबार जिल्हा शेवटचा
covid vaccination

नंदुरबार : कोवीड लसीकरणात राज्यात नंदुरबार जिल्ह्याचा शेवटचा क्रमांक आहे. यात पहिला डोस 58 टक्के तर दुसरा डोस 27 टक्के आहे. विशेष म्‍हणजे लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आदिवासी स्थानिक बोलीभाषेतून जागृती केली जात आहे. तरी देखील लसीकरणाचा टक्‍का वाढलेला नाही. (nandurbar-news-Nandurbar-district-last-number-in-covid-vaccination-in-the-state)

covid vaccination
सोयाबीनचे दर पोहोचले ६ हजार ८५० वर

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोवीड लसीकरणाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्याचा शेवटचा क्रमांक लागतो. लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात आहे.

बोलीभाषेतून जनजागृती

सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजाबाबत लसीकरण अत्यंत कमी आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये स्थानिक आदिवासी बोलीभाषेतून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ६ आय. सी. व्हॅनचे उद्घाटन जिल्हाधिकारी महेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागात सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 'हर घर दस्तक' अभियानांतर्गत लसीकरणाचा व्याप वाढवण्यात आला असून सदर आय. सी. व्हॅनच्या जनजागृती द्वारे ग्रामीण भागातील लसीकरणाचा टक्का वाढवण्यास मदत होईल अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस 58 टक्के तर दुसरा डोस 27 टक्के लसीकरण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com