केमिकल कंपनीत विस्फोट; दोन कामगार गंभीर जखमी

केमिकल कंपनीत विस्फोट; दोन कामगार गंभीर जखमी
केमिकल कंपनीत विस्फोट; दोन कामगार गंभीर जखमी

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा येथील आर. आर. इन्फॅक्ट कंपनीमध्ये बॉयलरमध्ये विस्फोट होऊन दोन कामगार गंभीर भाजले गेले आहे. त्यांना उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (nandurbar-news-navapur-chemical-campany-blast-two-worker-injured)

बेडकीपाडा येथील श्री आर. आर. इन्फॅक्ट टायर प्लांटमध्ये जुनाट टायर जाळून त्यापासून केमिकल तयार केले जाते. बॉयलरमध्ये गॅस तयार होऊन अचानक विस्फोट झाला. या विस्‍फोटात कंपनीत काम करणारे राकेश शृंगार (वय २३), पंकज वाघेला (वय २४) हे दोघ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार नवापूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गुजरात राज्यात नेण्यात आल्याची माहिती कंपनीचे मॅनेजर शर्मा यांनी दिली.

केमिकल कंपनीत विस्फोट; दोन कामगार गंभीर जखमी
आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरणासाठी करणार विशेष काम; नुतन जिल्हाधिकारी मनिषा खत्री

कारखाना बंदची मागणी

पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण, महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यापूर्वीही या ठिकाणी अपघात होऊन कामगार जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत आहे. सदर टायर कारखान्‍यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे असे प्लांट नवापूर तालुक्यात बंद करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तरी देखील संबंधित प्रशासनाने यावर ठोस उपाय योजना केली नाही. महसूल विभागाने अशा धोकादायक असणाऱ्या कंपन्यांवर लक्ष देऊन योग्य कारवाई करणे गरजेचे आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com