सीमा तपासणी नाक्यावर चार वजन काटे सील

सीमा तपासणी नाक्यावर चार वजन काटे सील
सीमा तपासणी नाक्यावर चार वजन काटे सील
navapur border

नवापूर (नंदुरबार) : येथील सीमा तपासणी नाक्यावरील वजन काट्यांपैकी चार वजन काटे दोषी आढळले. सद्भाव कंपनीच्या मनमानी कारभारामुळे महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड नवापूर येथील वजन माप विभागाकडून चार काटे सील करण्यात आले. वजन मापे विभागाकडून ही सद्भाव महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड यांच्यावर चार महिन्यांत दुसरी कारवाई झाली. (nandurbar-news-navapur-Four-weight-fork-seals-on-the-border-check-nose)

navapur border
ताडोबा जंगलातील थरार; पर्यटकांसमोर वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या नाशिक, धुळे जिल्हा तसेच मोटर मालक-कामगार वाहतूक संघटना यांच्या निवेदनानंतर वजन मापे विभागाकडून दखल घेतली गेली. १७ व १८ नोव्हेंबरला वजन माप उपनियंत्रक श्री. गिरणार व त्यांचे सहकारी पथक यांनी कारवाई करून सद्भाव कंपनी महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड यांच्या सीमा तपासणी नाक्यावरील १७ वजन काटे तपासणी केले. त्यांपैकी ४ वजन काट्यांमध्ये अनियमितता (दोष) आढळल्याने सील करण्यात आले. सद्भाव कंपनीला नोटीस देऊन त्यांच्या कंपनीच्या काट्यांमधील फरकाचे लवकरात लवकर निराकरण करण्याची तंबी देण्यात आली. तसे न केल्यास कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.

वजन काट्यांमध्‍ये फरक

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या नाशिक, धुळे तसेच मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेच्या कार्यालयात वाहन मालकांकडून सद्भाव महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड यांच्या वजन काट्यामध्ये फरक आहे. त्यामुळे आमची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी वाहन मालकांकडून आल्या आहेत. त्याअनुषंगाने सद्भाव कंपनीचे काटे चेक करावेत हे निवेदन वजन मापे विभागाला देण्यात आले होते. वजन माप विभागाने तत्परता दाखवून नाशिक येथील नियंत्रक अधिकारी, विभागीय सहनियंत्रक श्री. राजबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनियंत्रक श्री. गिरणार व त्यांचे सहकारी पथक यांनी आवश्यक ती कारवाई करून सद्भाव कंपनीच्या आधिपत्याखालील नवापूर येथील सीमा तपासणी नाक्यावरील वजन काट्यांपैकी चार वजन काटे दोषी आढळल्यामुळे काटे सील केले. या कारवाईमुळे ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस नाशिक, धुळे जिल्हा तसेच मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेने वजन मापे विभागाचे आभार मानले. यावेळी मोटर मालक-कामगार वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जाधव, किरण भालेकर, विनायक वाघ, नंदुरबार जिल्हाध्यक्ष अमन रघुवंशी हे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com