पोलिसांची दिखाव्याची छोटेखानी कारवाई; तंबाखूजन्य पान मसालाची सर्रास वाहतूक

पोलिसांची दिखाव्यची छोटेखानी कारवाई; तंबाखूजन्य पान मसालाची सर्रास वाहतूक
पोलिसांची दिखाव्याची छोटेखानी कारवाई; तंबाखूजन्य पान मसालाची सर्रास वाहतूक

नंदुरबार : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य विमल पान मसालाची वाहतूक करणाऱ्यावर नवापूर पोलिसांची कारवाई केली. मुळात गुजरात राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा तस्करी होत असतानाही दिखाव्यासाठी ही करवाई केली. (nandurbar-news-navapur-police-action-gujrat-state-tobacco-transport)

महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यातील बेडकी नाका परिसरातून अवैध गुटखासह दारू, लाकूड व अवैध धंद्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असतानाही पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. फक्त देखाव्यासाठी छोटेखानी कारवाई करून अवैध धंद्यांना हेतूपूर्ण दुर्लक्ष करत जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे.

सव्वाचार लाखाचा मुद्देमल जप्त

गुजरात राज्यातून सोनगड येथून नवापूरकडे ओमनी कार मधून अवैधरित्या तंबाखू विमल गुटखा पान मसालाची वाहतूक करणाऱ्या सोहेब युसूफ पठाण याला अटक करून नवापूर पोलिसांनी 4 लाख 24 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.

तेथे करवाई करण्यास पोलिसही सरसावेना

ज्या परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे; तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या लक्कडकोटमध्ये अवैध धंद्यांना बहर आली आहे. याठिकाणी गुजरात व महाराष्ट्रातून शेकडो महिला- पुरुषांच्या माध्यमातून जुगार खेळून लाखोंच्या उलाढाली होत असल्याचे चित्र असतानाही नवापूर पोलीस कारवाईचे धाडस दाखवत नाही. या अवैध धंद्यामुळे सीमावर्ती भागात घातपात व हत्यांचे सत्र देखील सुरू आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांना विचारले असता अवैध धंद्यांवर कारवाई सुरूच आहे आणि यापुढेही सुरूच राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सीमावर्ती भागातील अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई कधी करतील याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. नव्याने जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यावर काय भूमिका घेतात हेही बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.