आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरणासाठी करणार विशेष काम; नुतन जिल्हाधिकारी मनिषा खत्री

आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरणासाठी करणार विशेष काम; नुतन जिल्हाधिकारी मनिषा खत्री
आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरणासाठी करणार विशेष काम; नुतन जिल्हाधिकारी मनिषा खत्री
collector Manisha Khatri

नंदुरबार : जिल्ह्यातील कुपोषण, आरोग्य, शिक्षण, रिक्तपदे यासह महिला उद्योजिका घडविण्यासाठी विशेष लक्ष देऊन बचत गटांच्या माध्यमातून विशेष काम करण्यावर भर असेल. त्यासोबतच जिल्ह्यातील इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वांशी संवाद व समन्वय साधून त्यातून प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपण नेहमी प्राधान्य देणार असल्‍याचे जिल्ह्याचा पहिल्या महिला जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले. (nandurbar-news-new-collector-manisha-khatri-accepts-the-post-today)

नंदुरबारचे तत्‍कालिन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली झाल्यानंतर नुतन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आज (ता.१२) नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रभारी जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्याकडून पदभार स्विकारला. त्यानंतर त्‍यांनी संवाद साधत जिल्ह्यातील प्रश्‍न व समस्या जाणून घेतल्या. त्यात जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू, रिक्तपदांचा प्रश्‍न, अपुऱ्या सोयी- सुविधा, जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, वाळू तस्करी, रोजगार व स्थलांतर, वनजमिनी व पुर्नवसनाचे प्रश्‍न, बँकाकडून शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, कोरोनाबाबतची तयारी व अडचणी, जिल्ह्यती शासकिय जमीनी हस्तांतरीत करण्याचे प्रश्‍न, निधीचा योग्य विनियोग व आदिवासी जनतेसाठीच्‍या शासकिय योजनांची अंमलबजावणीसह महिला सबलीकरणाबाबतचे विविध प्रश्‍न मांडत संवादातून जिल्हाधिकारीं खत्री यांनी जाणून घेतले.

कुपोषणमुक्‍तीसाठी नवा पॅर्टन राबविणार

जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या, की मी महाराष्ट्रातच अनेक वर्षापासून सेवत कार्यरत आहे. त्यातच नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर आनंदच झाला. अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मेळघाटात काम केले आहे. तेथील मेळघाट पॅर्टनचा अनुभव आहे. त्यामुळे कुपोषणासाठी आपण जे काही नवीन करता येईल ते करणार. तसेच रोजगारासाठी महिलांना बचत गटाचा माध्यमातून तसेच आदिवासी विकास विभाग, स्वयंसेवी संस्था व महिला आर्थिक विकास महामंडळ असो की शासनानाच्या विविध योजनांचे एकत्रिकरण करून महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी आपले प्रयत्न असतील.

collector Manisha Khatri
आपल्‍यातीलच आगपेट्या घेवून जाळ करण्याच्‍या प्रयत्‍नात : मंत्री गुलाबराव पाटील

आदिवासींच्‍या योजनांची करणार अंमलबजावणी

कोरोनाची तिसरी लाटेच्या दृष्टीने आढावा घेऊन योग्य ते नियोजन करणार आहे. अतिदुर्गम भागातील प्रश्‍न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करेन, आता आदिवासी विकास विभागातून काम करून येथे आले. त्यामुळे आदिवासी विकास विभागाचा योजनांची योग्य अंमलबजावणी केली जाईल. बालकांसाठी आरोग्याचा काही वेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न आहे असे सांगितले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com