महामार्गावरचा थरार..ट्रक अडवत चालकाचे बांधले हातपाय; २७ लाखांचे कपडे लांबविले

महामार्गावरचा थरार..ट्रक अडवत चालकाचे बांधले हातपाय; २७ लाखांचे कपडे लांबविले
महामार्गावरचा थरार..ट्रक अडवत चालकाचे बांधले हातपाय; २७ लाखांचे कपडे लांबविले

नंदुरबार : धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडीजवळून साड्या, सलवार यासह विविध कपड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून चालकाचे हातपाय बांधून त्यातून सुमारे २७ लाखांचे कपडे चोरून नेल्याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (nandurbar-news-night-truck-robbery-Truck-driver's-limbs-tied-27-lakh-worth-of-clothes)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पन्नालाल नन्हेलाल चंद्रवंसी (वय ६०, रा. पायली खुर्द, ता. छपरा, मध्य प्रदेश) हे त्यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये (एमएच ४०, वाय ४३१९) सुरत सारोली येथून कपड्यांचा माल घेऊन धुळे- सुरत महामार्गाने नागपूरकडे जात होते. या वेळी विसरवाडी गावाच्या पुढे एका पुलाजवळ चार अनोळखी व्यक्तींनी चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करीत पन्नालाल चंद्रवंसी यांचा ट्रक अडविला.

महामार्गावरचा थरार..ट्रक अडवत चालकाचे बांधले हातपाय; २७ लाखांचे कपडे लांबविले
धुळ्याची लालपरी झाली हायटेक..७८७ बसला जीपीएस सिस्टिम

कपड्यांचे ९३ बॉक्‍स अन्‌ रोकड लंपास

चौघा अनोळखींनी पन्नालाल चंद्रवंसी यांना धमकावत बळजबरीने त्यांचे हातपाय बांधून पन्नालाल चंद्रवंसी यांना ट्रकसह दहिवेलजवळ घेऊन गेले. तेथे ट्रकमधून २७ लाख २२ हजार ४२३ रुपये किमतीचे ९३ बॉक्स, त्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या साड्या, सलवार व इतर ड्रेस पिस, ५०० रुपये किमतीचा मोबाईल व दहा हजारांची रोकड असा एकूण २७ लाख ३२ हजार ९२३ रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून नेला. याबाबत पन्नालाल चंद्रवंसी यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. एस. शिंपी तपास करीत आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com