Nandurbar: जुनी पेन्शनसाठी बाईक रॅली काढत आंदोलन

जुनी पेन्शनसाठी बाईक रॅली काढत आंदोलन
Nandurbar news
Nandurbar newsSaam tv

नंदुरबार : नंदुरबार शहरात महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय (Teacher) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी; या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालय ते (Nandurbar) जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढून आंदोलन करण्यात आले. (Nandurbar Today News)

महाराष्ट्र राज्यात नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत नेमणूक झालेल्या सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करत सन 1982 ची जुनी पेन्शन योजना रद्द केली. शासनाने मोठा अन्याय केलेला आहे. याबाबत संघटनेच्या वतीने सातत्याने तीव्र विरोध करत आंदोलने केली जात आहे.

प्रशासनाला निवेदन

नंदुरबार शहरात कर्मचारी संघटनेच्यावतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी; या मागणीसाठी जनजागृती निर्माण करत बाईक रॅली काढून आंदोलन करण्यात आले. दरम्यान संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. शासनाने 1982 ची जुनी पेन्शन योजना रद्द करून कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय केलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सदर आंदोलन जुनी पेन्शन करिता व्यापक आंदोलन उभे करण्याचा पहिला टप्पा असून शासनाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com