२० फूट पुलावरून पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु; रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात

२० फूट पुलावरून पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु; रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात
२० फूट पुलावरून पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु; रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात
AccidentSaam tv

नंदुरबार : धडगांव शहरापासून अवघ्या 1 कि.मी. अंतरावर असलेल्या उमराणी खुर्द व वडफळ्या दरम्यान नाल्याच्या फरशी पुलावरुन दुचाकीस्वार पंधरा ते वीस फूट खाली पडुन (Death) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (nandurbar news one dies after falling from 20 feet bridge Accident due to potholes on the road)

Accident
एकनाथ खडसे तातडीने मुंबईला; जळगावातील सर्व कार्यक्रम केले रद्द

प्रथम दर्शनी दिलेल्या माहितीनुसार धडगांवच्या दिशेने निघालेली दुचाकी (क्र. एमएच. 39. बी. 2597) उमराणी व वडफळ्याच्या दरम्यान असलेल्या पुलावर (Accident) अडकली. तर दुचाकीस्वार खाली कोसळल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

वीस फुट खाली पडल्‍याने डोक्‍याला मार

अपघात झाल्यानंतर दुचाकी पुलावरच अडकली. मात्र दुचाकीस्वार साधारणतः 15 ते 20 फूट उंचीच्या पुलावरून (Nandurbar News) खाली फेकला गेला. त्यामुळे डोक्याला मार लागुन मृत्यु झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेची माहीती स्थानिक नागरिकांकडुन पोलीस ठाणे धडगांव यांना कळविण्यात आली. माहिती मिळताच (Police) पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन शव ग्रामीण रुग्णालय धडगांव येथे पाठवण्यात आले. मृत व्यक्तीची ओळख पटली असुन उतऱ्या आरश्या वळवी (वय ४६, रा. सूर्यपूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पुढील तपास धडगाव पोलीस करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com