तर नंदुरबारकरांची पाणीपट्टीही कमी करा; भाजपची मागणी

तर मग नंदुरबारकरांची पाणीपट्टीही कमी करा; भाजपची मागणी
तर नंदुरबारकरांची पाणीपट्टीही कमी करा; भाजपची मागणी

नंदुरबार : चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन दिवसाआड पाणीपुरवठयाची घोषणा इतर पक्षांना विचारात न घेता का केली? खोलघर धरणात ७१ टक्के पाणी साठा आहे. आबेंबारा धरण ओव्हरफ्लो आहे. मग जनतेला वेठीस का धरता. दोन दिवसाआड़ पाणी देत असाल तर पाणीपट्टी कमी करा; अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली.

शहराला दोन दिवसाआड़ पाणी पुरवठा करण्यबाबत रघुवंशी यांनी सकाळी सांगितले. यावर भारतीय जनता पक्षतफे पत्रकार परिषद घेत निषेध केला.

तर पाणीपट्टी कमी करा

दोन दिवसाआड पाणी पुरवठा करत असेल तर पाणीपट्टी कमी करा; अशी मागणी देखील भाजपने केली. चंद्रकांत रघुवंशी यांच्या अनधिकृत फार्म हाऊसमध्ये पाणी येऊ नये; म्हणून पाणी भरू देत नसल्याचा आरोप भाजपने केला. नंदुरबार नगर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

नंदुरबारकरांना दूषित पाणी

अनधिकृत फार्म हाऊसवरील दहा ते बारा संडासाचे दूषित पाणी धरणात सोडले जाते. नंदुरबारकरांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जातो; असेही भाजपने सांगितले.

खड्डे बुजवा आंदोलन करणार

शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे आहेत. पालिकेचे दुर्लक्ष आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी खड्डे बुजवा आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले.

त्या कुटुंबाना काही मदत नाही

मोकाट जनावरे, कुत्रे याच्यामुळे मुर्त्यू झालेल्या कुटुंबांना अद्याप कोणतीही मदत नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांच्या चावात मुर्त्यु झालेल्या मुकेशच्या मुलीला न्याय देऊन मदत मिळावी; अशी मागणी भाजपने केली.

Related Stories

No stories found.