भारत बंदमध्‍ये विविध शेतकरी संघटनांचा सहभाग...शहाद्यात काँग्रेसकडून निदर्शने

भारत बंदमध्‍ये विविध शेतकरी संघटनांचा सहभाग...शहाद्यात काँग्रेसकडून निदर्शने
भारत बंद
भारत बंद

नंदुरबार : दिल्ली येथील शेतकरी आंदोलन नाला २८४ दिवस पूर्ण झाले आहेत. देशातील वाढती महागाई व शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधातील या लढ्याला अधिक प्रखर करण्यासाठी दिल्ली किसान मोर्चा व देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये नंदुरबार जिल्ह्यात नवापूर शहर वगळता इतर तालुक्यांमध्ये अल्प प्रतिसाद दिसून आला. (nandurbar-news-Participation-of-farmers-organizations-in-Bharat-Bandh-Demonstrations-by-Congress-in-Shahada)

विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय व शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर या तालुक्यांत तहसील कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करून निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांचे कामगार नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत बंद
मोदी हटाव, देश बचाव’चा नारा.. भारत बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

कायदे रद्द करा

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावे. तसेच पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे महागाईत भरमसाठ वाढ झाल्याने केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावे अशा मागण्या करण्यात आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com