Nandurbar: आंदोलानापूर्वी पोलीसांनी पुतळा घेतला ताब्यात; नाना पाटोलेंना अटक करण्याची मागणी

आंदोलानापूर्वी पोलीसांनी पुतळा घेतला ताब्यात; नाना पाटोलेंना अटक करण्याची मागणी
nandurbar bjp
nandurbar bjpsaam tv

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात नंदुरबार जिल्हा भाजपतर्फे आंदोलन करत निवेदन देण्यात आले. नंदुरबार (Nandurbar) शहरात नाना पटोले यांच्या पुतळयाचे दहन करण्यापूर्वीच त्यांचा पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला. (nandurbar news Police seize nana patole statue before agitation)

nandurbar bjp
चिमुकलीच्‍या धाडसाचा गौरव; जळगावच्‍या शिवांगीला प्रधानमंत्री बालशक्‍ती पुरस्‍कार

आज सकाळपासूनच विजय चौधरी यांच्या विजयपर्व निवासस्थानी पोलिसांनी गराडा घातला होता. याप्रसंगी भाजपा (BJP) कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीसांनी नाना पटोलेंचा (Nana Patole) पुतळा ताब्यात घेतल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, उपनगर पोलीस निरीक्षक नरेन्द्र भदाणे व शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सरचिटणीस निलेश माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, शहर अध्यक्ष नरेंद्र माळी, किरण वाडीले, खुशाल चौधरी, लियाकत बागवान, डॉ. सपना अग्रवाल, प्रशांत चौधरी, सदानंद रघुवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

ही तर पंतप्रधानांना धमकी

निवेदनात नमूद केल्यानुसार भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका निवडणुकीच्या दरम्यान 'मी मोदींना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे बेताल वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा अपमानच केला नाही तर एका प्रकारे पंतप्रधान याना मारण्याची धमकी दिली. यावरून काँग्रेसची मोदींच्याबद्दल शत्रुत्वाची भावना स्पष्ट होते. या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाने जाहीर निषेध व्यक्त करून नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com