जुगार अड्ड्यावर धाड; १६ जण पोलिसांच्या ताब्यात

जुगार अड्ड्यावर धाड; १६ जण पोलिसांच्या ताब्यात
जुगार अड्ड्यावर धाड; १६ जण पोलिसांच्या ताब्यात
जुगार

नंदुरबार : नवापूर शहराजवळ जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई केली. जुगाराचे साहित्य साधने असा १ लाख ८६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या कारवाईत क्लब मालकासह १६ जण पोलिसांच्या ताब्यात घेतले.

जुगार
धुळ्यात ब्राऊन शुगर सापडल्याने खळबळ; आय जी पथक आणि मोहाडी पोलिसांची कारवाई

नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नवापूर शहराजवळ स्थित मानस हॉटेल शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी रात्री एक वाजता जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईमध्ये क्लब मालकासह गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील एकूण १६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य साधने व रोखड असा १ लाख ८६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत नवापूर पोलीस ठाणेमध्ये महाराष्ट्र जुगार कलम कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नवापूर पोलीस अधिक तपास करीत आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या पथकाने केली आहे.

अवैध धंदे रोखण्याचे आव्‍हान

महाराष्ट्र- गुजरात सीमेला लागून असलेल्या नवापुर शहराजवळ जुगार अड्ड्यां सह दारु तस्करी व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पोलिसांसमोर कारवाईचे मोठे आव्हान आहे.

Related Stories

No stories found.