वेटींगवरील कुपोषित बालकांसाठी पंधरा बेड उपलब्‍ध

जिल्ह्यात दहा हजारांहुन अधिक कुपोषित बालक असतांना आणि त्यातही एक हजारांहुन अधिक बालक सॅम श्रेणीत असतांना अवघी दोन मुले ही जिल्ह्यातल्या सहा पोषण पुर्नवसन केंद्रात दाखल होती.
वेटींगवरील कुपोषित बालकांसाठी पंधरा बेड उपलब्‍ध

नंदुरबार : कोरोना काळात नंदुरबारमधील कुपोषणाकडे झालेल्या दुर्लक्षाचे व्यापक परिणाम समोर येत असुन आता कुपोषित मुलांचे पालक त्यांना पोषण पुर्नवसन केंद्रांमध्ये दाखल करण्यासाठी पुढे येत आहेत. या साऱ्या परिस्थीतीमुळे या केद्रामध्ये बेड कमी पडत आहेत. यामुळे कुपोषित बालकांचे काही बरेवाईट झालेच तर याला जबाबदार कोण असाच काहीसा प्रश्न निर्माण होत आहे. (nandurbar-news-15-beds-available-for-treatment-of-malnourished-children)

कोरोना काळात प्रशासनाचे कुपोषणाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाची दाहकता वाढली. त्याचे परिणामही आता दिसून येत आहे. कोरोना काळात मार्च महिन्यात जिल्ह्यात दहा हजारांहुन अधिक कुपोषित बालक असतांना आणि त्यातही एक हजारांहुन अधिक बालक सॅम श्रेणीत असतांना अवघी दोन मुले ही जिल्ह्यातल्या सहा पोषण पुर्नवसन केंद्रात दाखल होती.

पोषण पुर्नवसन केंद्र झाले लसीकरण केंद्र

डोंगराळ खडतर भाग असलेल्या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील अक्कलकुवा, मोलगी आणि धडगाव पोषण पुर्नवसन केंद्राना तर मार्चमध्ये बालकांची प्रतिक्षा होती. मात्र कोरोनाच्या भितीमुळे पालक कुपोषित बालकांना दाखल करत नसल्यामुळे या ठिकाणी चक्क लसीकरण केंद्रच सुरु करण्यात आले होते.

वेटींगवरील कुपोषित बालकांसाठी पंधरा बेड उपलब्‍ध
खानदेशातील १५ हजार शेतकरी झाले वीजबिल थकबाकीमुक्‍त

आता बालकांनाच बेड नाही

कोरोना आता आटोक्यात येत असल्याने कुपोषणाची दाहकता वाढत असुन कुपोषित बालकांना पोषण पुर्नवसन केद्रात दाखल करण्यासाठी पालक देखील पुढे येत आहेत. मात्र वाढलेल्या कुपोषणामुळेच आता पोषण पुर्नवसन केद्रांमध्ये कुपोषित बालकांना बेड मिळत नसुन त्यांना अक्कलकुवा सारख्या ग्रामीण रुग्णालयात बेडच उपलब्ध होत नसल्याने उपचारांसाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचे भयावह चित्र दिसुन आले आहे.

‘साम’ वरील बातमीनंतर प्रशासन जागे

कोरोनामुळे याठिकाणचे बेड हे कोरोना वार्डासाठी आरक्षीत करण्यात आले आहे. म्हणुन तुटपुंज्या बेडवरच कुपोषित मुलांचे उपचार करण्याची नामुश्की आरोग्य प्रशासनावर आली आहे. मुळातच आता धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा रुग्णच नाही. तर मग परवानगी न घेताच याही बेडचा वापर या ठिकाणच्या प्रशासनाने कुपोषित बालकांना दाखल करुन घेण्यासाठी करणे आवश्यक होते. मात्र त्यासाठी देखील कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असलेल्या प्रशासन या कुपोषीत बालकांचे बरे वाईट झाल्यास अंग झटकरण्या खेरीज दुसरे काहीही करणार नसल्याचे बोलले जात आहे. साम टीव्हीने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य विभागाने १५ बेड उपलब्ध केले असल्याची माहिती दिली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com