रूबी घोडीची वटच न्‍यारी..रोज पाच लिटर दूध अन्‌ एक किलो गावरान तूप

उत्तर प्रदेश हुन ३३ लाखाची रुबी २१ लाखांचा सुलतान तर मध्य प्रदेश उज्जैन येथून २१ लाखांचा युवराज नावाचे उमदे अश्व दाखल...
sarangkheda
sarangkheda

नंदुरबार : देशात पुष्करच्या मेळाव्यानंतर घोडे बाजारासाठी क्रमांक दोनचा बाजार असलेल्या सांरगखेडा घोडेबाजाराला १८ तारखेपासुन सुरवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मागच्या वर्षी घोडे बाजार होवु शकला नव्हता. यंदा मात्र प्रशासनाने यात्रोत्सव रद्द केला असला तरी घोडे बाजाराला मात्र परवानगी दिली आहे. बाजारात आतापर्यंत एक हजाराहून अधिक जातिवंत घोडे दाखल झाले आहेत. यापैकी १५० घोड्यांची विक्री झाली असून आतापर्यंत ५४ लाख ८२ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. (nandurbar-news-sarangkheda-festival-150-horses-have-been-sold)

sarangkheda
तिसऱ्या लाटेत दीडपटीने रुग्ण वाढीचा अंदाज; जानेवारीच्या शेवटी लाट

सध्या सारंगखेडा (Sarangkheda) घोडे बाजारात चर्चा आहे ती २१ लाखांचा युवराज, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) बरेलीहुन दाखल झालेला सुलतान, रुबी यांच्या ऐटदार रुबाबाची. बाजारात दाखल झालेल्या उमद्या घोड्यांना पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी अनेक घोडेस्वारांना भुरळ पडली आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत देशाच्या इतर राज्यातून आणखी घोडे दाखल होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

२१ लाखाचा सुलतान

या बाजारात आतापर्यत १ हजारहुन अधिक विविध उमद्या जातीचे घोडे दाखल झाले असुन उत्तर प्रदेश राज्यातून बरेली येथून मोहम्मद आसिफ गेल्या आठ वर्षापासून सारंगखेडा घोडेबाजार खरेदी-विक्रीसाठी येत असतात. यंदा त्यांनी सुलतान नावाचा नुकरा जातीचा उमदा घोडा विक्रीसाठी आणला असून त्याची किंमत २१ लाख आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर घोडेबाजार होऊ शकला नव्हता. यंदा मात्र त्यांनी आणलेल्या घोड्यांना चांगला दर मिळवून विक्री होण्याची अपेक्षा आहे. सारंगखेड्याच्या घोडे बाजारात आणखी चर्चा आहे, तो उज्जैनहून (Ujjain) दाखल झालेला अवघ्या ३२ महिन्याचा युवराजची. पांढराशुभ्र युवराज नुकरा जातीचा अश्व आहे. त्याचे कान मारवाड आहेत. त्याची उंची ६५ इंच इतकी आहे. युवराज ची किंमत २१ लाख इतकी आहे.

रूबीला लागते रोज पाच लिटर दूध एक किलो गावराण तूप

याव्यतिरिक्त सारंगखेड्याचा घोडे बाजारात दाखल झालेली रुबी महाराणीप्रमाणे रुबाबदार आहे. रुबीची किंमत तब्बल ३३ लाख आहे. तिची उंची ६३ इंच आहे. चाल रुबाबदार आहे. रुबीची विशेषता म्हणजे तिला दररोज ५ लिटर दूध, एक किलो गावराण तूप, चणाडाळ, गहू, बाजरीसोबत कोरडा सुका चारा दिला जातो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com