लसीकरणासाठी टोकन पद्धती; गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य

लसीकरणासाठी टोकन पद्धती; गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य
लसीकरणासाठी टोकन पद्धती; गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य
corona vaccination

सारंगखेडा (नंदुरबार) : बँकेत नागरिकांच्या रांगांवर नियत्रंण ठेवण्यासाठी संबंधित बँक प्रशासन नागरिकांना टोकण देते. टोकण मिळाल्याने नागरिक काहीसे निश्चित होतात. विशेषतः ज्येष्ठांना त्याचा दिलासा मिळतो. हाच प्रयोग सारंगखेडा (ता. शहादा) येथील ग्रामपंचायत मार्फत लसीकरण केंद्रावर राबविला जात आहे. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या रांगावरील नियंत्रणासह लसीकरण स्थळीही नियंत्रण ठेवता येत आहे. (nandurbar-news-sarangkheda-gram-panchayat-corona-vaccination-Token-methods)

गावातील लसीकरण केंद्राबाहेर ज्येष्ठांसह १८ वरील तरुणांची पहाटेपासूनच कोरोना लसीकरणासाठी रांगा लागत आहे. यात हस्तक्षेप व वशिलेबाजीचे आरोप होत आहेत. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन सारंगखेडा ग्रामपंचायतीने आरोग्य विभागातील लसीकरण कर्मचारी, शिक्षक, पोलिस प्रशासन यांची विशेष बैठक घेऊन लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी टोकण पद्धतीचा वापरावर भर देण्यात आला. टोकण घेतल्याने वेळेत लस मिळणार असल्याने ग्रामस्थांसह लसीकरण करण्यास केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही सुलभतेने काम करता येत आहे. केंद्रासमोर गर्दी होत नसल्याने गोंधळाचे प्रमाणही कमी झाले आहे. या पध्दती मुळे लसीकरणात काही प्रमाणात सुसूत्रता आल्याने जेष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

corona vaccination
ग्रामसेवकाचा सही देण्यास नकार; भरती प्रक्रियेत अडचणी

लसीकरण केंद्रावरील गर्दी पाहून टोकण पध्दत सुरू केले आहे. केंद्रावर अन्य गावातील नागरिक येथेच लसीकरणाला येत होते. त्यांना आठवड्यातून चार दिवस त्याच गावांमध्ये लसीकरण होईल. जेवढे लस उपलब्ध होईल तेवढेच टोकण वाटप करण्यात -येत आहे.

- पृथ्वीराज रावल, सरपंच, सारंगखेडा

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com