सत्यशोधक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दिल्ली येथील आंदोलनाला भेट

सत्यशोधक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दिल्ली येथील आंदोलनाला भेट
सत्यशोधक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दिल्ली येथील आंदोलनाला भेट
Farmer strike

नंदुरबार : जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी असल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची स्थिती नाजूक आहे. तरी केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तयार केलेले कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्या अकरा पदाधिकाऱ्यांनी सिंधु बॉर्डर, टिकरी बॉर्डर, व दाजीपुर येथील शेतकरी आंदोलनाला भेट देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने सहभाग नोंदवला आहे.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला २६ जुलैला आठ महिने पूर्ण होतील. शेतकरी जसा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूंच्या परिस्थितीशी सामना करून अन्नधान्य पिकवून आपली जबाबदारी पूर्ण करतात. त्या जगाचा पोशिंदाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी मंडप व तंबूत शिरल्यानंतरही आंदोलन सुरूच ठेवले असल्याचे चित्र पाहायला मिळते.

Farmer strike
महाविकास आघाडीचे नेते प्रसिद्धीसाठी करतात काम : माजी ऊर्जामंत्री बावनकुळे

आंदोलनात नंदुरबारचे शेतकरी

केंद्र सरकार जोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे मागे घेत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. तसेच २२ जुलैपासून २०० शेतकऱ्यांच्या पथकांकडून संसदेकडे मोर्चा वळवला जाणार असून एक तर आम्हाला अटक करा नाहीतर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा; अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सत्यशोधक शेतकरी संघटनेचे रामसिंग गावीत, किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी, वंजी गायकवाड, रणजित गावीत, दिलीप गावीत, रामा गावीत, प्रशांत सोनवणे, वामन निकम या पदाधिकाऱ्यांनी सिंधु बॉर्डर, टिकरी बॉर्डर, व दाजीपुर येथील शेतकरी आंदोलनाला भेट देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने सहभाग नोंदवला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com