महामार्ग दुरुस्तीसाठी रास्ता रोको; आंदोलकांचा एमएसआरडीसीला घेराव

महामार्ग दुरुस्तीसाठी रास्ता रोको; आंदोलकांचा एमएसआरडीसीला घेराव
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : विसरवाडी ते सेंधवा राष्ट्रीय महामार्गावरील शहादा तालुक्यातील तापी नदीवरील प्रकाशा पूल आणि गोमाई नदीवरील पूल व डांबरखेडा दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे (Accident) संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान आंदोलकांनी एमएसआरडिसीच्या अधिकाऱ्यांना घेरुन जाब विचारला. (Nandurbar News Shahada Road Block)

Nandurbar News
Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ उतार सुरूच

राष्‍ट्रीय महामार्गावरील प्रकाशा (Prakasha) पूलाची दुरावस्‍था झाली आहे. महामार्गावर मोठ मोठे खड्डे असून अपघात होत आहे. याबाबत (Nandurbar News) तक्रार केल्‍यानंतर गेल्या काही महिन्यांपासून फक्त आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांना ठोस उपयोजनाचे उत्तर देता आलेले नाही. नेहमीप्रमाणे आजही एमएसआरडिसीचे अधिकारी रस्ता दुरुस्तीसाठी तत्काळ उपाययोजना केल्या जाणारा असल्याचे आश्वासन रास्ता रोको आंदोलनकर्त्यांना दिले आहे.

आता तरी अपघात थांबतील का?

सदर रस्त्यावर पूलांच्या दुरावस्थेत व खड्ड्यांमुळे अपघातात अनेक जणांचे बळी गेले आहे. आता तरी एमएसआरडिसी जागे होऊन रस्ता दुरुस्त करेल का? हा प्रश्न कायम आहे. रास्ता रोको आंदोलनामध्ये शहादा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व नागरिक, वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्दैवाची बाब म्हणजे या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करून वाहनचालकांचे जीव धोक्यात टाकल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.‌

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com