दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Accident

नंदुरबार : जिल्ह्यात अक्कलकुवा- तळोदा व शहादा- प्रकाशा रस्त्यावर दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत तळोदा व शहादा पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. (nandurbar-news-shahada-road-two-accident-case-and-three-death)

कुंडल (ता. धडगाव) येथील विनेश बिंदास पाडवी (वय २३) व खुंटामळी (ता. धडगाव) येथील भिका गीना पाडवी (वय २२) हे दोन युवक गुरूवारी (ता.२) दुपारी एक ते दीडच्या सुमारास अक्कलकुवाकडून तळोदाकडे मोटर सायकल (क्र. एमएच- १८ एक्स ५१७५) ने जात होते. यावेळी तळोद्याकडून अक्कलकुवाकडे जाणाऱ्या टेम्पो (एमएच-३९ डी. ४ डीएस २१ ७२) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने गाडी चालवत समोरील मोटर सायकलला जोरदार धडक दिली. त्यात विनेश पाडवी व भिका पाडवी हे दोघे तरुण मोटर सायकल वरून पडून गंभीर जखमी झाले. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर वाहन चालक मात्र तेथून पसार झाला. याबाबत इंद्रा पाडवी यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध प्राणांकित अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे

Accident
Nagpur news: 'ही वादळापुर्वीची शांतता'

दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्‍या

तसेच दुसऱ्या घटनेत गुरूवारी (ता.२) दुपारी चारच्या सुमारास शहादा प्रकाशा रस्तावर दगा भगवान पाटील (वय ५५, आयोध्यानगर शहादा) हे मोटरसायकल (क्र. एमएच ३९, एम ११५०) वरून शहादाकडे जात होते. यावेळी समोरून येणारे मोटर सायकल (क्र एमएच ३९, एल ६३७०) ने जोरदार धडक दिली. त्यात अपघात होऊन दगा भगवान पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सोनू दगा पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यावरून अज्ञात मोटरसायकलस्वारा विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com