चार महिन्‍यांपासून उसाचे पेमेंट थकित; शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

चार महिन्‍यांपासून उसाचे पेमेंट थकित; शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
चार महिन्‍यांपासून उसाचे पेमेंट थकित; शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
Farmer

नंदुरबार : शेतकऱ्यांच्‍या शेतातील ऊस कापून कारखान्‍याने घेतला. परंतु, चार महिने उलटून देखील उसाचे थकित पेमेंट अदा केले नाही. यामुळे संपप्‍त शेतकऱ्यांनी आज कारखान्‍यात जावून अर्धनग्‍न आंदोलन केले. (nandurbar-news-shahada-satpuda-sahkari-sugar-factory-Sugarcane-payment-overdue-for-four-months-farmers)

शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे पेमेंट थकित आहे. अनेक शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट बाकी असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, अनेकदा मागणी करून देखील उसाचे थकित पेमेंट मिळत नाही. शेतकरी वारंवार कारखान्‍यात जात असताना त्‍यांना रिकाम्‍या हाताने परतावे लागते.

Farmer
वेटींगवरील कुपोषित बालकांसाठी पंधरा बेड उपलब्‍ध

संतप्‍त शेतकऱ्यांचे आंदोलन

गेल्या चार महिन्यापासून ऊस तोड होऊनही पेमेंट मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी आज थेट कारखान्यात जावून थकित रक्‍कमेसाठी आवाज उठविला. कारखान्‍याच्‍या कार्यालयात जावून अर्धनग्न आंदोलन केले. थकीत उसाचे पैसे मिळावेत म्हणून आंदोलन बराच वेळ गोंधळ घातला.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com