मंदिरात देवीच्या मूर्तीचे उघडले डोळे..भाविकांची गर्दी; काय आहे सत्‍य जाणून घ्या

मंदिरात देवीच्या मूर्तीचे उघडले डोळे..काय आहे सत्‍य जाणून घ्या
मंदिरात देवीच्या मूर्तीचे उघडले डोळे..भाविकांची गर्दी; काय आहे सत्‍य जाणून घ्या

नंदुरबार : शहादा तालुक्यातील कोचरे येथील खेडकोचर मातेच्या मंदिरातील मूर्तींचे आषाढ महिन्यात भाविकांद्वारे साफसफाई केल्यानंतर सिंदुराने माखलेल्या मूर्तीचे डोळे पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर प्रज्वलित झाले होते. सदर मूर्तीचे फोटो, व्हिडिओ भाविकांकडून सोशल मीडियावर वायरल करून मूर्तीचे डोळे उघडले असल्याची अफवा पसरवली गेली. या अफवांमुळे परिसरातील भाविकांनी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ केला होता. (nandurbar-news-shahada-The-eyes-of-the-idol-of-the-goddess-opened-in-the-temple-viral-news)

आषाढ महिन्यानिमित्त खेडकोचरा मातेची साफ सफाई सुरू होती. एका अज्ञात इसमाने फोटो काढून मातेचे डोळे उघडले असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे अफवा उडाली व भक्तांनी मातेच्या मंदिरात एकच गर्दी केली होती. आषाढ महिना सुरू असताना या वेळेस भक्तगण हे नैवेद्य दाखवण्यासाठी येथे येत असतात. या अफवेमुळे त्यांची गैरसोय होत असून पोलीस प्रशासनाची दमछाक होत आहे. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे कोचरा येथील सरपंच सुनीता ठाकरे यांनी सांगितले.

मंदिरात देवीच्या मूर्तीचे उघडले डोळे..भाविकांची गर्दी; काय आहे सत्‍य जाणून घ्या
Breaking चोपडा शिवारात हेलिकॉप्‍टर कोसळले

नैवद्य दाखवण्यासाठी झुंबड

बघ्यांच्या तुंबळ गर्दी मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्यात आले. मंदिरातील मातेचे डोळे उघडले; या अफवेमुळे भक्तगण नैवद्य दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने गर्दी पांगवण्यासाठी पोलिस प्रशासनाला पाचारण करण्यात आले. या अफवेमुळे मंदिरातील नागरिकांची गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाची मोठी दमछाक उडाली.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com