Nandurbar: शिवसेनेला मोठे भगदाड; नंदुरबार जिल्‍ह्यातील कार्यकर्ते शिंदे गटात होणार सामील

शिवसेनेला मोठे भगदाड; नंदुरबार जिल्‍ह्यातील कार्यकर्ते शिंदे गटात होणार सामील
Nandurbar Shiv Sena
Nandurbar Shiv SenaSaam tv

नंदुरबार : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात राजकारण सत्ता बदलाचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यातील पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील राजकारणात मोठी ढवळाढवळ झाली आहे. याचे परिणाम (Zilha Parishad) जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांवरही पडणार आहे. (Nandurbar News Shiv Sena Eknath Shinde)

Nandurbar Shiv Sena
दोन दिवसानंतर‌ जळगावात पुन्हा खून; एकाच महिलेशी प्रेमसंबंधातून खूनाचा संशय

नंदुरबार (Nandurbar) आदिवासी बहुत जिल्हा सुरवातीपासूनच (Congress) काँग्रेसचा गड राहिलेला आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून सातपुड्याच्या अति दुर्गम भागात ही (Shiv Sena) शिवसेना पक्ष वाढत असतानाच महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (Eknath Shinde) पक्षातूनच आमदारांचा वेगळा गट तयार करून सत्ता बदल घडवून आणलेली आहे. याचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यात स्पष्ट होताना दिसत असून तळागाळात शिवसेना पक्ष वाढत असतानाच मोठे भगदाड पडले आहे.

शिंदे गटात होणार सामील

माजी आमदार चंद्रकातं रघुवंशी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील जवळपास दोन हजार कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर करणार आहे. आज सकाळपासूनच कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलाबार हिल बंगल्यावर नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक शिंदे गटाला समर्थन देणार आहेत. त्यामुळे दोन नगरपरिषद, दोन पंचायत समिती सदस्यांसह जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी शिवसेनेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होणार आहे.

जिल्‍हाध्‍यक्षांचा भाजपमध्‍ये प्रवेश

दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत मोरे यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत भाजपाचे कमळ हाती घेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे जल्लोषात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे शिवसेना पक्षाला जिल्ह्यात मोठे भगदाड पडले आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचा गड शिवसेनेच्या ताब्यात जाईल असे वाटत असतानाच राजकारणातील मोठी ढवळाढवळ झाल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपण नेमकं कोणत्या गटामध्ये जायचं याचा प्रश्न पडला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com