शिवसेनेने नंदुरबार जिल्ह्याला दिला आदिवासी आमदार

शिवसेनेने नंदुरबार जिल्ह्याला दिला आदिवासी आमदार
शिवसेनेने नंदुरबार जिल्ह्याला दिला आदिवासी आमदार
Shiv SenaSaam tv

नंदुरबार : राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या विधानसभा मतदार संघातील रहिवासी असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी आता विधान परिषदेवर निवडून आल्याने आमदार झाले आहेत. आमश्या पाडवी यांच्या रूपाने आता नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून शिवसेनेचा पहिला आमदार झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. दरम्यान, विधान परिषदेसमोर आदिवासी बांधवांनी निकालापूर्वीच ठेका धरला होता. (nandurbar news Shiv Sena gives tribal MLA aamshya padvi to Nandurbar district)

Shiv Sena
मोठा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदेंसह हे '१७' आमदार नॉट रिचेबल; मविआ सरकार धोक्यात?

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील तळागाळातला शिवसेनेचा (Shiv Sena) कार्यकर्ता आमश्या पाडवी यांनी सातपुड्याच्या दोर्‍या खोऱ्यात शिवसेना पक्ष मजबूत करण्याची भूमिका निभावल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह वरिष्ठ शिवसेना पदाधिकाऱ्यांचा असलेला विश्वास सार्थ ठरला आहे. एका सामान्य आदिवासी शिवसैनिकाला विधान परिषदेची उमेदवारी देऊन शिवसेनेने आमश्या पाडवी यांना २६ मतांनी विजयी करून नंदुरबार जिल्ह्याला आदिवासी आमदार दिला आहे.

आदिवासी नृत्‍य करत जल्‍लोष

आमश्या पाडवी विधान परिषदेची उमेदवारी जिंकून आमदार झाल्याने अक्कलकुवा तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला आहे. थेट मुंबईतच आदिवासी ढोल वाजवून सिबली नाचवत आदिवासी रूढी परंपरेनुसार सांस्कृतिक नृत्य सादर करत दुपारपासूनच जल्लोष साजरा केला होता. आमश्या पाडवी आमदार झाल्याने जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे वर्चस्व वाढणार आहे. विशेष म्हणजे अक्राणी विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे धनुष्यबाण मजबुतीने बळकटी मिळणार हे मात्र निश्चित आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com