नंदुरबार : एसटी कर्मचाऱ्यांचे विठुरायाला साकडे

नंदुरबार : एसटी कर्मचाऱ्यांचे विठुरायाला साकडे
नंदुरबार : एसटी कर्मचाऱ्यांचे विठुरायाला साकडे
विठुरायाला साकडे

नंदुरबार : राज्‍य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. सरकार दरबारी मार्गी लागावा याकरीता नंदुरबार एसटी आगारात कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाला अभिवादन करून एसटीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून साकडे घालण्यात आले. (Nandurbar-news-ST-employees-kartik-ekadashi-celebreat-bus-Depot)

नंदुरबार एसटी आगारात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काम बंद आंदोलनाचा आठवा दिवस आहे. यात आज कार्तिकी एकादशी असल्‍याने यानिमित्त नंदुरबार एसटी आगारात कर्मचाऱ्यांच्यावतीने विठुरायाला अभिवादन करून एसटी महाराष्ट्र शासनात विलीनीकरणाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा असे साकडे विठुरायाला करण्यात आले.

विठुरायाला साकडे
स्‍वखर्चातून रस्‍त्‍याची डागडुजी; सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

एसटीची पंढरपुर वारी चुकली

कार्तिकी एकादशीनिमित्त दरवर्षी एसटी माऊली वारकऱ्यांना पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम करत होती. त्यामुळे वारकऱ्यांचा एसटी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा असून विठ्ठला महाराष्ट्र शासनाला सद्सद्विवेक बुद्धी दे आमची मागणी पूर्ण होऊ दे.. असे साकडे विठुरायाला करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com