एसटी संपाचा फटका..नंदुरबार जिल्ह्यात ३१ हजार विद्यार्थी गैरहजर

एसटी संपाचा फटका..नंदुरबार जिल्ह्यात ३१ हजार विद्यार्थी गैरहजर
एसटी संपाचा फटका..नंदुरबार जिल्ह्यात ३१ हजार विद्यार्थी गैरहजर
st strike

नंदुरबार : एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employee Strike) सुरू असलेल्या संपामुळे एसटीची चाके थांबली आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. आता शाळा-महाविद्यालये सुरू झाली असून, ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे शाळेत जायचे कसे, असा प्रश्‍न पडला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीचे ३१ हजार ३९ विद्यार्थी दररोज शाळेत गैरहजर राहत आहेत. एवढेच काय तर अनेक शाळा ग्रामीण विद्यार्थी पटसंख्येवर अवलंबून असून,त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांअभावी शुकशुकाट दिसून येत आहे.

st strike
ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराचे स्टिंग ऑपरेशन; कन्नड घाटातील वसुलीचा भांडाफोड...(पहा व्हिडिओ)

दिवाळीच्या सुट्या संपल्या. शाळेची घंटा पुन्हा नियमित वाजू लागली आहे. मात्र, शाळा-महाविद्यालये सुरू झाली असली, तरी सध्या शाळांमध्ये शहरातील विद्यार्थीच हजर राहत असल्याचे चित्र आहे. किंवा ज्या गावात स्थानिक स्तरावर शिक्षणाची सोय आहे. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट दिसून येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे शाळांच्या उपस्थिती संख्येवर मोठा परिणाम जाणवत आहे. स्थानिक स्तरावर शिक्षणाची सोय नसलेल्या विद्यार्थ्यांना बसने प्रवास करीत रोज शहर किंवा जवळपास शिक्षणाची सोय असलेल्या ठिकाणी ये-जा करावी लागत आहे. शाळा सुरू होऊन आठवडा उलटला तरीही काही विद्यार्थ्यांना शाळेत जाणे दुरापास्त झाले आहे.

खासगी प्रवास न परवडणारा

एसटी बंद असल्याची संधी साधत खासगी प्रवासी वाहतुकीने भाडेवाढ करून अक्षरशः लूट सुरू केली आहे. यामुळे प्रवासी वैतागले आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना दररोज खासगी वाहनाने शाळेत ये-जा करणे न परवडणारे आहे. ज्या विद्यार्थी पालकांकडे स्वतःचे वाहन आहे, ते रोज शाळेत सोडत आहेत. मात्र, त्यासाठी पालकांचे काम वाढले आहे. नोकरदार पालक ड्यूटीवर जातील, की पाल्यांना शाळेत सोडणे व आणण्याचे काम करतील, असा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकही दुर्लक्ष करीत आहेत. विद्यार्थी मात्र, शिक्षण बुडत असल्याने जीव मुठीत धरल्यागत झाले आहेत.

शिक्षण विभागाचे सर्वेक्षण

जिल्ह्यात बससेवा बंदच्या पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम यांनी सर्वेक्षण केले. त्यात जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या एकूण २९० शाळा आहेत. त्यापैकी सर्वेक्षणात २४८ शाळांनी माहिती भरली आहे. त्यानुसार एक लाख ३७ जार ७०१ विद्यार्थी आहेत. त्यापैकी गुरुवारी (ता. २५) केवळ २९ हजार विद्यार्थी उपस्थित होते. म्हणजे जवळपास केवळ २५ टक्के उपस्थिती होती. एसटी बंदचा विचार केला, तर त्यात ३१ हजार ३९ विद्यार्थी ग्रामीण भागातून बस बंदमुळे शाळेत येऊ शकत नसल्याचे चित्र आहे.

मुलींची संख्या जास्त

मुलीला शिक्षणासाठी शाळेत ये- जा करण्यासाठी मोफत प्रवास पासची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अर्ध्यात शिक्षण सोडणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. त्यासाठी मानव विकाल मिशनर्तंगत स्वतंत्र बससेवा दिली आहे. मात्र, संपामुळे तीही बंद असल्याने मुली शाळेत येऊ शकत नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com