Shahada News: दूध भेसळ विरोधात धडक; शहाद्यात एका डेअरी चालकावर गुन्हा

Nandurbar News : दूध भेसळ विरोधात धडक; शहाद्यात एका डेअरी चालकावर गुन्हा
Shahada News
Shahada NewsSaam tv

सागर निकवाडे 
नंदुरबार
: दूध भेसळीच्या विरोधात दूध भेसळ नियंत्रण समितीच्यावतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. या समितीने (Shahada) शहादा तालुक्यात हि कारवाई सुरु केली असून अनेक दूध डेअरीवरील (Milk) दुधाचे नमुने घेतले तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तर अन्न परवाना नसलेल्या एका डेअरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

Shahada News
Nagpur Crime: प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवले; धमकी देत खंडणी मागितली, तणावातून तरुणाने संपवलं जीवन

नंदुरबार जिल्ह्यात दूध भेसळीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत अनेक तक्रारी जिल्हा नियंत्रण समितीकडे प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींची दखल घेत जिल्हा नियंत्रण समिती आणि (FDA) अन्न औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस दलाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईच्या सत्र सुरू आहे. या कारवाईत आज शहादा तालुक्यातील खाजगी दूध डेअरी तसेच खाजगी दूध विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.  

Shahada News
Bhandara News: मंदिराच्या प्रवेशद्वाराचे गेट लावताना घडले दुर्दैवी; विद्युत धक्का लागून मजुराचा मृत्यू

दुधाचे नमुने घेत पाठविले प्रयोगशाळेत 

अनेक ठिकाणचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर एका डेअरी चालकाकडे अन्न औषध प्रशासन विभागाचा परवाना नसल्याने त्याच्या विरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अचानक दूध विक्रेत्यांचा विरोधात सुरू झालेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com