Nandurbar: चोरट्यांनी रात्रीत फोडले पाच दुकाने; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

चोरट्यांनी रात्रीत फोडले पाच दुकाने; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Nandurbar News Theft
Nandurbar News TheftSaam tv

नंदुरबार : तळोदा शहरातील कॉलेज चौफुली ते वनविभाग कार्यालय परिसरात पाच ते सहा ठिकाणी चोरट्यांनी दुकाने फोडून दुकानात शिरून रोख रक्कम व साहित्य (Theft) चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांसमोर (Police) चोरट्यांनी आव्हान उभे केले असून चोरट्यांना तातडीने जेरबंद करा अशी मागणी व्यापारी संघटनेसह शहर वाशियांकडून होत आहे. (Nandurbar Taloda Shop Theft)

तळोदा (Taloda) येथे दुकानात झालेल्‍या चोरीचा प्रकार जय किसन आग्रो या दुकानात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात चोरांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. मध्यरात्री दोन चोर रेनकोट घालून फिरत आहेत. लोखंडी रॉडच्या सहाय्याने शटर फोडून दुकानात टॉर्चचा साहाय्याने गल्ले तपासताना दिसत आहे. मास्क परिधान केलेल्या चोरांच्या हालचाली (CCTV) सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून समोर आल्या आहेत. नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com