रोझवा सिंचन प्रकल्पाला गळती; लाखो लिटर पाणी वाया

रोझवा सिंचन प्रकल्पाला गळती; लाखो लिटर पाणी वाया
रोझवा सिंचन प्रकल्पाला गळती; लाखो लिटर पाणी वाया
Rozwa

तळोदा (नंदुरबार) : तालुक्यातील रोझवा सिंचन प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीतून व नादुरुस्त जॅकवेलमधून अहोरात्र लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गळती लागलेली सांडव्याची भिंत व नादुरुस्त जॅकवेल दुरुस्तीला पाटबंधारे विभागाला वर्षानुवर्षे मुहूर्त मिळत नसल्याची परिस्थिती आहे. (nandurbar-news-taloda-taluka-Leak-to-Rozwa-Irrigation-Project-Millions-of-liters-water-wasted)

Rozwa
‘पोर्नोग्राफी’चा डाग.. जळगाव-धुळ्यासह देशभरात सीबीआयचे छापे

प्रकल्पातील वाया जाणारे पाणी पाहत शेतकरी प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पाटबंधारे विभागाची उदासीन भूमिका प्रकल्पाची दुरुस्ती रखडवण्यास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यात प्रकल्पातील पाणीसाठा आजच निम्म्यावर येऊन पोचल्याने पाणी किती दिवस टिकते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

पाणीसाठा होतो पण टिकत नाही

तालुक्यातील रोझवा प्रकल्पाची दुरुस्ती वर्षानुवर्षे कळीचा मुद्दा बनून राहिली आहे. दरवर्षी शेतकरी पाटबंधारे विभागाकडे प्रकल्पाच्या दुरुस्तीची मागणी करतात. मात्र पाटबंधारे विभागाचे या प्रकल्पाकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. दरवर्षी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा होतो; मात्र लाखो लिटर पाणी वाया जाऊन वर्षभरही प्रकल्पात पाणीसाठा टिकत नसल्याची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्याहून कमी झाला होता. तर फेब्रुवारी महिन्यातच प्रकल्पाने तळ गाठायला सुरवात केली होती. त्यामुळे प्रकल्पात वर्षभर पाणी टिकत नसताना पाटबंधारे विभाग पाणी वाचविण्यासाठी कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पाठविलेल्‍या प्रस्‍तावाचे काय?

तळोदा तालुक्यासाठी महत्त्वाच्या या प्रकल्पासाठी नाही म्हणायला दुरुस्तीसाठी नोव्हेंबर डिसेंबर २०१९ मध्ये २५ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. प्रत्यक्षात या प्रस्तावाचे पुढे काय झाले, प्रस्ताव नामंजूर झाला की मंजूर, की केवळ कागदावरच दुरुस्ती केली गेली, असे अनेक प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. मात्र या प्रकल्पातील पाणीसाठा टिकवण्यासाठी पाटबंधारे विभागाची गांधारीची भूमिका अजूनही संपलेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com