सारंगखेडा जवळील पुलाचा भराव खचला; पुलावरून ऐकेरी वाहतुक

सारंगखेडा जवळील पुलाचा भराव खचला; पुलावरून ऐकेरी वाहतुक
सारंगखेडा
सारंगखेडा

नंदुरबार : दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सारंगखेडा तापी नदीच्या टाकरखेडा (ता. शिंदखेडा) गावाजवळील पुलाला लागून असलेला भराव खचल्याने पुलाला मोठा धोका होण्याची शक्यता नागरिकांकडून व वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे. (nandurbar-news-tapi-river-bridge-near-Sarangkheda-was-filled-Single-transport-from-the-bridge)

सोनगीर ते शहादा हा पूर्वी राज्य महामार्ग क्रमांक १ चा मार्ग होता. हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग १६० मध्ये वर्ग करण्यात आला आहे. यामुळे या रस्त्याकडे कोण लक्ष घालणार, हा विषयदेखील चर्चेचा ठरत आहे. या पुलाची दयनीय अवस्था झाली असून, आता नवीन टाकरखेडा गावाजवळील पुलाला असलेला भराव खचल्याने या पुलावरून रहदारी करणे धोक्याचे ठरणार आहे. या रस्त्यावरून गुजरात, राजस्थानमध्ये प्रदेश या राज्यातून ये-जा करणारी मोठी अवजड वाहनांची वर्दळ असते. त्याचबरोबर वाळू वाहतूक करणारेदेखील मोठी अवजड वाहने ये-जा करतात.

सारंगखेडा
अक्कलपाडा धरणातून विसर्ग; पांजरा नदी दुथडी, तीन पुलांवरील वाहतुक बंद

पुलाला धोका

टाकरखेडा गावाजवळील भराव खचल्याने फुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर टाकरखेडा गावाजवळील याच पूर्वेकडचा भरावालादेखील तडे गेल्याने या पुलाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता परिसरातील नागरिक व वाहनधारक व्यक्त करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com