भाजपने पुकारलेले आंदोलन पोलिसांनी दडपले; कार्यकर्त्यांना अटक

भाजपने पुकारलेले आंदोलन पोलीसांनी दडपले; कार्यकर्त्यांना अटक
भाजपने पुकारलेले आंदोलन पोलिसांनी दडपले; कार्यकर्त्यांना अटक
BJP

नंदुरबार : दंगली घडवून आणल्याच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. (nandurbar-news-The-agitation-called-by-BJP-was-suppressed-by-the-police)

BJP
नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपला रामराम

त्रिपुराच्या पार्श्वभुमीवर राज्यात नांदेड, अमरावती आणि मालेगाव याठिकाणी झालेल्या घटनांच्या निषेधार्थ आज भाजपने पुकारलेले आंदोलन पोलीसांनी दडपले आहे. आज या साऱया घटनांच्या निषेधार्थ भाजप आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार होते. मात्र सकाळी सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप कार्यालयात गोळा झाल्यानंतर ते कार्यालयाच्या बाहेर पडताच पोलीसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस गाडीतून त्यांची रवानगी पोलीस स्टेशनकडे केली आहे.

आंदोलन न करण्याची नोटीस

भाजप जिल्हाध्यक्षांना कालच कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभुमीवर आंदोलन न करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही पोलीस नोटीसीला न जुमानता ते आंदोलनावर ठाम राहिल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थीतच्या पाश्वभुमीवर पोलीसांनी हि कारवाई केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरींसह आमदार राजेश पाडवींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

भाजपतर्फे निषेध

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा घेऊन जात असताना पोलिसांनी रस्त्यात अडवून भाजपच्‍या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या दडपशाहीचा यावेळी भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com