Nandurbar: पाचवी ते बारावीचे वर्ग होणार सुरू

पाचवी ते बारावीचे वर्ग होणार सुरू
school open
school opensaam tv

नंदुरबार : कोरोनामुळे राज्‍यातील बंद झालेल्‍या शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्‍यानुसार नंदुरबार जिल्‍ह्यात इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. मात्र पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यात येणार नसल्‍याबाबतचे परिपत्रक जिल्हाधिकारी मनिषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी आज काढले आहे. (nandurbar news There will be classes from 5th to 12th standerd)

school open
Corona Rule: कोरोना नियमांचे उल्लंघन; दीड हजार नागरिकांवर कारवाई, तीन लाखावर दंड वसूल

राज्‍यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढू लागल्‍यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला होता. परंतु, काही भागात कोरोना बाधितांचा पॉझिटीव्‍हीटी रेट कमी आहे. याचा आढावा घेत २४ जानेवारीपासून पुन्‍हा सुरू करायचा निर्णय झाला. परंतु, स्‍थानिक प्रशासनावर कोरोना रूग्‍णांची संख्‍या पाहून निर्णय सोपविला आहे. त्‍यानुसार नंदुरबार (Nandurbar) जिल्‍हाधिकारी यांनी शाळांबाबत पत्रक काढले आहे. परिपत्रकानुसार २४ जानेवारी २०२२ पासुन शाळा सुरु करणे संदर्भात शासननिर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आदेश दिले आहेत.

ऑनलाईन/ऑफलाईन अध्यापन

२४ जानेवारी सोमवारपासून नंदुरबार जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरु (School Open) करण्यात याव्यात. तसेच जे विद्यार्थी शाळांमध्ये येत नसतील अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन/ऑफलाईन अध्यापनाच्या संदर्भात उचित कार्यवाही करावी. शाळेची वेळ विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ अशी असेल तर शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित रहावे. मात्र या वर्गाना अध्यापन करणार्‍या शिक्षकांनी शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहुन ऑनलाईन/ऑफलाईन अध्यापनाची उचित कार्यवाही करावी. शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेने नियोजन करुन शालेय कामकाज कोव्हीड-१९ च्या निर्देशाप्रमाणे सुरळीत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आज दिले. तसेच इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग तुर्तास सुरु करण्यात येऊ नये.

मोठ्या गावांमध्‍ये पालकांची संमती

ज्या मोठ्या गावांमध्ये व नगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी पालकांची संमती घेऊन शाळा सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. शाळांमध्ये कोरोना बाधित शिक्षक अथवा विद्यार्थी आढळून आल्यास सदर शाळा ५ दिवस बंद ठेवावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com