प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये तीन हजारावर बोगस लाभार्थी : खासदार डॉ. हीना गावित

जिल्ह्यात १ लाख ४३ हजार शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, त्यातून अजून १४ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये तीन हजारावर बोगस लाभार्थी : खासदार डॉ. हीना गावित
हीना गावितहीना गावित

नंदुरबार : जिल्ह्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी सुरू असून त्यात आतापर्यंत ३ हजार १९३ लाभार्थी बोगस आढळून आले आहेत. त्यात अनेकजण अज्ञात असल्याचे नमूद केला आहे, त्यामुळे योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. हीना गावित यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (nandurbar-news-Three-thousand-bogus-beneficiaries-in-Pradhan-Mantri-Gharkul-Yojana)

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दिशा समितीच्या बैठकीत खासदार गावित यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी आलेल्या तक्रारीवर देखील चर्चा करण्यात आली. त्याबाबत माहिती देण्यासाठी खासदार गावित यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, जिल्ह्यात १ लाख ४३ हजार शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, त्यातून अजून १४ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. किसान क्रेडिट कार्डचे तीन लाख लाभार्थी आहेत, त्यापैकी ६२ हजार ७८६ लोकांना कार्ड मिळाले, पण त्यांनी कर्ज घेतले नाही.

योजना राबविणाऱ्या यंत्रणेवर गुन्हे दाखलबाबत निर्णय

खासदार डॉ. गावित म्हणाल्या, पंतप्रधान घरकुल योजनेत घोळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती, त्याची चौकशी झाली, त्यात २८ हजार घरकुलांच्या चौकशीत, ३ हजार १९३ बोगस लाभार्थी समोर आले आहे. त्यांच्यासह योजना राबविणाऱ्या यंत्रणेवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनरेगा, गोठे, विहिरी, शौचालय या योजनेमध्ये देखील गैरव्यवहार झाले असून त्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे.

हीना गावित
इंजिनिअरींग करणारी भावंडे- शेतात अभ्यास करुन करताहेत आई वडिलांनाही मदत

तो पाठपुरावा डॉ. गावितांचाच

कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीकरिता पालकमंत्री ॲंड. के.सी. पाडवी यांनी पाठपुरावा केल्याचे म्हटले आहे, त्यावर खासदार डॉ. गावित म्हणाल्या, पालकमंत्रींनी मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा केलेला नाही. मेडिकल कॉलेज व्हावे, ही डॉ. विजयकुमार गावित यांची संकल्पना आहे, त्यासाठी तेच पाठपुरावा करून निधी आणत आहे, कोविड काळातही पालकमंत्री कुठं गेले होते,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com