अंदाज चुकला..नंदुरबारमध्‍ये रिमझिम पाऊस

अंदाज चुकला..नंदुरबारमध्‍ये रिमझिम पाऊस
अंदाज चुकला..नंदुरबारमध्‍ये रिमझिम पाऊस
Rain

नंदुरबार : जिल्‍ह्यात या आठवड्यात समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. असे असताना देखील दिवसभर रिमझिम पावसानेच हजेरी लावली. यामुळे आजही नंदुरबारकरांच्या हाती निराशाच लागली. (nandurbar-news-today-no-rain-in-Nandurbar-district)

पावसाचे तीन महिने सरले असतानाही नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत केवळ ३०२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सरासरीच्या ४२ टक्के पाऊस झाला आहे. राज्याच्या इतर भागात धो- धो पडणाऱ्या पावसाने नंदुरबार जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीपासूनच पाठ फिरवली आहे.

जोरदार पावसाची होती शक्‍यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार १ सप्टेंबरला जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. परंतु दिवसभर अधूनमधून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने जिल्हावासियांच्या समाधानकारक पावसाच्या अपेक्षेच्या पदरी निराशाच हाती लागली आहे.

Rain
वरच्‍यावर पाहणी अन्‌ प्रत्‍येक नुकसानाच्‍या भरपाईची हमी; राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले अन्‌ गेले

पिकांना मोठा फटका

नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या तीन महिन्यात पर्जन्यमानाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने खरीप हंगामातील शेती पिकांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील तापी नदी वगळता इतर कोणत्याही नदीला पूर आलेला नसून धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झालेला नाही. पावसाचा शेवटचा महिना सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com