नंदुरबार : सिंदिदिगर घाटात गाडी दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, पंधरा जखमी

नंदुरबार : सिंदिदिगर घाटात गाडी दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, पंधरा जखमी
नंदुरबार : सिंदिदिगर घाटात गाडी दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, पंधरा जखमी
Accident

नंदुरबार : जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम भाग असलेल्‍या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतुक करणारी खाजगी क्रुजर गाडी दरीत कोसळुन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असुन जवळपास पंधराहुन अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहीत समजत आहे. (nandurbar-news-toranmad-ghat-car-accident-eight-death-and-fifteen-injured)

सिंदिदीगर घाटातून सायंकाळच्या सुमारास क्रुझर गाडी प्रवाशांना घेवुन जात होती. अतिशय खडतर असलेल्या या भागात नुकताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतुन रस्ता बनला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा भाग तोरणमाळसोबत जोडला गेला आहे. असे असले तरी अवघ्या सहाच महिन्यात या रस्तावरील हा दुसरा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे हा सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर आणि खडतर असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहे. पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचाव कार्य राबवत असुन जखमींना तोरणमाळ, म्हसावद याठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात हलवल्या जात आहे. तर जिल्हा मुख्यालयातून पोलीस अधिक्षकांसह अनेक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. प्रशासनाने अद्यापही कुठलीही माहिती दिली नसून, याठिकाणी कव्हरेज नसल्यानेच माहिती मिळण्यात अडसर निर्माण होत आहे.

Accident
तेलाचे तळे साचले अन्‌ नागरीकांनी भरल्‍या कॅन

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

सिंदिदिगर घाटातून प्रवाशी वाहतुक करणारी क्रुझर गाडी जवळपास वीसच्‍या जवळपास प्रवाशी घेवून जात होती. यात चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने गाडी थेट दरीत कोसळल्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अतिशय खोल दरी असल्‍याने यात आठ जणांचा जागीच मृत्‍यू झाला असून, पंधरा प्रवाशी जखमी असल्‍याचे सांगण्यात येत आहे. परंतु, अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com