अवैध मद्याची वाहतूक; कंटेनरसह १ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध मद्याची वाहतूक; कंटेनरसह १ कोटी १४ रुपयांचा मुद्देमाल जप्त
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर स्थानिक पोलिसांकडून कारवाई सुरू होती. यानुसार अवैधरीत्या अन्‍य राज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन (Nandurbar News) शुल्क विभागाची कारवाई केली आहे. यात 1 कोटी 14 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (nandurbar Transportation of alcohol Items worth Rs 1 crore 14 including container seized)

Nandurbar News
नवजात शिशू, प्रसूत मातांसाठी अत्याधुनिक सुविधायुक्‍त रूग्णालय; पालकमंत्री गुलाबराव पाटील

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नसल्याने जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोडमध्ये आल्याने गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील न्याहली शिवारात दोंडाईचा ते नंदुरबार रस्ता न्याहली गावाजवळ टाटा कंपनीचा पॅक बॉडी असलेला कंटेनर (क्र. MH- 46- F 4868) सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल ब्ल्यु व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकुण १ लाख ३६८० पेट बाटल्या (२१६० बॉक्स) दिसुन आले. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलमान्वये करण्यात आली. सदरची कार्यवाही डी. एम. चकोर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, पी. जे. मेहता, दु. निरीक्षक, एस.एस. रावते दुय्यम निरीक्षक, पी. एस. पाटील दु.निरीक्षक सोबत जवान सर्वश्री अविनाश पाटील, भुषण एम.चौधरी, हितेश जेठे, वाहन चालक हेमंत पाटील, राजेंद्र पावरा, एम.एम. पाडवी, संदीप वाघ, हर्षल नांद्रे इत्यादींनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी. जे. मेहता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.

१ कोटी १४ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

सदर कारवाईत वाहनासह संशयित आरोपी रोहित जालिंधर खंदारे (रा. पोखरापुर खंदारे वस्ती ता. मोहोळ जि. सोलापुर), अविनाश मोहन दळवे (रा.पोखरापुर, ता. मोहोळ जि. सोलापुर) यांना अटक करण्यात आली असून कंटेनरसह एकुण १ कोटी १४ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com