Corona Update: कोरोनामुक्त धडगाव तालुक्यात आठ महिन्यांनी दोन रुग्ण

कोरोनामुक्त धडगाव तालुक्यात आठ महिन्यांनी दोन रुग्ण
Corona Update: कोरोनामुक्त धडगाव तालुक्यात आठ महिन्यांनी दोन रुग्ण
corona updatesaam tv

नंदुरबार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात सर्वात आधी कोरोनामुक्त झालेला पहिला धडगाव तालुका येथे दोन रुग्ण सक्रीय झाले आहेत. लसीकरणाचा टक्का कमी असतानाही आठ महिन्यांनी कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला असून उपाययोजनांना वेग आला आहे. (nandurbar news Two patients after eight months in dhadgaon taluka)

corona update
Crime News: मुलाने आईवर केला चाकूने वार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात सर्वात पहिला कोरोनामुक्त झालेल्या धडगाव (Dhadgaon) तालुक्यात तब्बल आठ महिन्यांनी दोन रुग्ण आढळल्याने उपाययोजनांना वेग आला आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वात कमी लसीकरण झालेला जिल्हा म्हणून नंदुरबारचे (Nandurbar) नाव पहिले आहे. त्यात जिल्ह्यातून सगळ्यात कमी लसीकरण (Corona Vaccination) झालेल्यांमध्ये धडगाव आणि अक्कलकुवा हे तालुके अग्रक्रमाने असले तरी या दोन्ही तालुक्यांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्याही कमी आहे.

धडगाव तालुक्‍याची आघाडीच

जिल्ह्यातील इतर पाच तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र राज्यातील सर्वात अतिदुर्गम भाग असलेला सातपुड्यातील धडगाव तालुका आधीच आरोग्य व्यवस्था तोकडी असतानाही व लसीकरणाचा टक्का कमी असतानाही कोरोना संक्रमित रुग्णांची संख्याही घटविण्यात धडगाव तालुका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. धडगाव आरोग्य विभागाच्यावतीने बाजारपेठेतील व्यापारी दुकानदार यांची वारंवार आरटीपीसीआर चाचणींवर भर दिला जात आहे. तर धडगाव तहसीलदार व पोलिस प्रशासनाच्यावतीने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

दोन ॲक्टिव्ह रुग्ण

धडगाव तालुक्यात आतापर्यंत ८६३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी ८३८ जण उपचारादरम्यान बरे झाले असून २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या स्थितीत २ रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संक्रमित रुग्णांची संख्या वाढू नये. यासाठी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com