दोन वर्षाचा चिमुरडा घराबाहेर गेला अन्‌ रस्‍ता विसरला; पोलिसांमुळे दीड तासात आईच्‍या कुशीत

दोन वर्षाचा चिमुरडा घराबाहेर गेला अन्‌ रस्‍ता विसरला; पोलिसांमुळे दीड तासात आईच्‍या कुशीत
child missing
child missing

नंदुरबार : बाहेरगावाहून नंदुरबार शहरात पाहुणा म्हणून आलेला दोन वर्षांचा बालक घरातून बाजारपेठेत आल्यानंतर घरी परत जाण्याचा रस्ता विसरला. चिमुरडा रडु लागल्‍याने दोन युवकांनी त्याला शहर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांना सगळी हकीगत सांगितली. यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या दिड तासाच्या आत बालकाच्या परिवाराचा शोध घेऊन आईचा ताब्यात देत पोलीस दलातील संवेदनशील मनाचा परिचय दिला. (nandurbar-news-Two-year-old-child-went-out-the-house-and-forgot-the-road-police-search-family)

child missing
कंगना राणावतला पाठविली स्‍वातंत्र सैनिकांची पुस्‍तके; धुळ्यातील युवतीकडून निषेध

धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील मास्टरनगरीमध्ये राहणाऱ्या सना कौसर शोएब खान त्यांची आई व (बालक) अल्फेज (वय २) नंदुरबार येथील मुजावर मोहल्ला येथे राहणाऱ्या त्यांचा मावसा शेख ईक्बाल शेख ईस्माईल यांच्याकडे पाहुणे म्हणून बुधवारी (ता.१७) आले.

चालत चालत बाजारपेठपर्यंत गेला

दरम्यान आज सकाळी साडेदहाच्‍या दरम्यान घराचे दार उघडे असतांना दोन वर्षीय बालक अल्फेज बाहेर पडला. चालत चालत मुजावर मोहल्लाहुन थेट गणपती मंदिरापर्यंत पोहचला. त्याला परत घरी जाण्याचा रस्ता आठवत नसल्याने तो रडायला लागला. गणपती मंदिराजवळ दुकान असलेल्या विवेक अशोक डाबी (रा.भाट गल्ली नंदुरबार) व योगेश निंबा माळी (रा. मोठा माळीवाडा, नंदुरबार) यांना बालक रडत असल्याचे दिसले. त्यांनी त्या बालकाला नाव विचारले असता त्याने अल्फेज असे सांगितले. मात्र त्याला पत्ता सांगता येत नसल्याने युवकांनी बालकाला घेवुन थेट नंदुरबार शहर पोलीस ठाणे गाठले तेथे पोलीसांना हकिगत सांगितली.

सोशल मिडीयावर संदेश फिरविला अन्‌

पोलीसांनी याबाबत सोशल मिडीयासह विविध निरोप त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पाठवला. याबाबतता निरोप त्यांच्या घराशेजाऱ्यांना लागल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाणे गाठत बालकाच्या नातेवाईंकाना फोन केला. बालकाची आई व त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. यावेळी सर्व ओळख पटल्यानंतर पोलसांनी अल्फेज या बालकाला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. अवघ्या दिड तासात पोलीसांनी हरवलेल्या बालकाचा शोध लावला. दिड तासाच्या कालावधीत पोलीस व त्या दोन युवकांनी बालकाला आई वडीलांसारखे सांभाळले. सदरची कामगिरी माधुरी कंखरे, विजयकुमार चौधरी, अमोल जाधव, हेमंत बारी यांनी परिश्रम घेतले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com