Shahada: मध्यरात्री अज्ञातांकडून पेट्रोल टाकून मोटरसायकल, जनरेटर जाळल्याचा प्रकार

मध्यरात्री अज्ञातांकडून पेट्रोल टाकून मोटरसायकल, जनरेटर जाळल्याचा प्रकार
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत मध्यरात्री चार चाकी वाहनाने आलेल्या दोन अज्ञात इसमांनी जनरेटर व दोन दुचाकींवर पेट्रोल (Petrol) टाकून जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. हे कृत्य सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाले असून नागरिकांनी याबाबत पोलिसांना खबर दिली आहे. (Nandurbar Shahada News)

Nandurbar News
Jalgaon: ग्रामपंचायत कर वसुलीच्‍या खोट्या आकडेवारीला विराम

शहादा (Shahada) पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे. सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले दोन्ही अज्ञात व्यक्ती चार चाकी वाहनाने आल्यानंतर तोंडाला मास्क लावून गाड्या व जनरेटरवर पेट्रोल टाकून जाळत असल्याचे समोर आले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी लागलीच पोलिसांना (Police) माहिती दिल्याने घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत.‌ गाड्या विजवल्याची माहिती स्थानिक नागरिकांना दिली आहे.

आग लावून फरार

अज्ञात माथेफिरूनी चार जनरेटर व दोन दुचाकींवर पेट्रोल टाकून आग लावल्यानंतर पोबारा केला होता अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या घटनेबाबत अधिक तपास शहादा पोलीस करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com