नवापूरमध्‍ये अवकाळी पाऊस; कापलेल्‍या भात पिकाचे नुकसान
अवकाळी पाऊस

नवापूरमध्‍ये अवकाळी पाऊस; कापलेल्‍या भात पिकाचे नुकसान

नवापूरमध्‍ये अवकाळी पाऊस; कापलेल्‍या भात पिकाचे नुकसान

नंदुरबार : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यातच आज नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाचा शिडकाव झाला. नवापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने भात, कापूस पिकांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. (nandurbar-news-Unseasonal-rains-in-Navapur-Damage-to-the-harvested-paddy-crop)

अवकाळी पाऊस
दोन वर्षाचा चिमुरडा घराबाहेर गेला अन्‌ रस्‍ता विसरला; पोलिसांमुळे दीड तासात आईच्‍या कुशीत

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज संध्याकाळच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. नवापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने कापणी केलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने पुढील आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास भात, कापूस पिकांसह फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खरीपनंतर रब्‍बीवरही संकट

नंदुरबार जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात कमी पर्जन्यमानामुळे नगदी पिकांसह इतर पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असताना आज सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे आणखी भर पडणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन भरपाई देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com