
सागर निकवाडे
नंदुरबार : मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच आहे. यानंतर आज देखील (Nandurbar) नंदुरबारसह नवापूर, शहादा (Shahada) शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. (Tajya Batmya)
राज्यात अधूनमधून अवकाळी पावसाचा (Rain) धडाका सुरू आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाच्या पारा ४० अंश सेल्सीअसपेक्षा अधिक असल्याने उकाळाच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली होती. परंतु, नंदुरबारमध्ये आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाळापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
कांदा, पपईचे नुकसान
एक तास चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घराचे देखील नुकसान झाल्याची भिती वर्तवण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेल्या कांदा, पपई, केळी या पिकांचे नुकसान होणार आहे. तर विक्रीसाठी मार्केटात आणलले कडधान्यांच्या देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.
रेल्वे बोगद्याला तलावात स्वरूप
नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्यातून मार्गस्थ होताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. गेल्या ४ वर्षापासून या बोगद्याचे काम सुरूच आहे. मात्र खांडबारा रेल्वे बोगदाच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या भुयार या जागी आता तलाव तयार झाल्याचं चित्र आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.