डाकीण संदर्भातील व्हायरल व्हिडिओ..धडगाव पोलीस ठाण्यात दोन पुरुष व एक महिलेविरुद्ध गुन्हा

डाकीण संदर्भातील व्हायरल व्हिडिओ..धडगाव पोलीस ठाण्यात दोन पुरुष व एक महिलेविरुद्ध गुन्हा
Nandurbar
NandurbarSaam tv

नंदुरबार : जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासी समाजाच्या अनोळखी महिलेला डाकीण असल्याच्या संशयावरून विवस्र करून छळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर धडगाव पोलीस (Police) ठाण्यात दोन अज्ञात पुरुष व महिलेविरुद्ध नरबळी अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून सदर व्हिडिओ (Viral Video) कोणत्या गावाचा आहे. याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. (nandurbar news Viral video Crime against two men and a woman at Dhadgaon police station)

Nandurbar
माकडाने गावात पसरविली दहशत; अनेकांना घेतला चावा

आदिवासी समाजातील महिलेला डाकीण असल्याच्या संशयावरून विवस्त्र करून छळ केल्याचे दोन वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सदर व्हिडिओ नेमके कोणत्या गावाचे आहेत; याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. मात्र व्हिडिओमध्ये संभाषण झालेली आदिवासी भिलोरी भाषा मध्यप्रदेश, महाराष्ट्र (Maharashtra) या दोन राज्यांच्या सीमेवरील गावांमध्ये बोलली जात असल्याचे समोर येत असल्याने सदर व्हिडिओ मध्यप्रदेश राज्यातील गावांमधून असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर दोन्ही व्हिडिओमध्ये महिला डाकीण असल्याच्या संशयावरून विवस्त्र करून छळवणूक केली जात असल्याचे निदर्शनास येत असल्याने चर्चेचा विषय ठरले आहे.

सत्‍य नेमके काय?

याबाबत राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सध्या तरी दोन्ही व्हिडिओ नेमक्या कोणत्या गावाचे आहेत आणि ती महिला व पुरुष कोणत्या कारणावरून छळवणूक करत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com