Nandurbar News : पेट्रोल चोरीच्या घटनांमुळे गावकरी वैतागले; पोलिसांकडे केली मोठी मागणी

पेट्रोल चोरीची (Theft) घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पेट्रोल (Petrol) चोरीमुळे वैतागलेल्या गावकऱ्यांकडून गावात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे
file photo
file photo saam tv

नंदुरबार : जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडीत भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी मोटरसायकलीतून पेट्रोल आणि सायकल चोरीच्या सातत्याने घटना घडत आहेत. विशेष म्हणजे यातील एक पेट्रोल चोरीची (Theft) घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पेट्रोल (Petrol) चोरीमुळे वैतागलेल्या गावकऱ्यांकडून गावात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे. (Nandurbar News In Marathi )

file photo
धुळे-शिंदखेडा रस्त्यावर विचित्र अपघात, तीन जणांचा मृत्यू, एक जण गंभीर

देशभरात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या अनेक घटना परिसरात घडत आहेत. अशीच एक पेट्रोल चोरीची घटना विसरवाडी सारख्या ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयाजवळ शिवमंदिर परिसरात रात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. घरासमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत पेट्रोल चोरीची घटना कैद झाली आहे. या ठिकाणी पेट्रोल चोरीसाठी हा चोरटा गेला आणि घरासमोर उभी मोटारसायकलीतून खाली बसून पेट्रोल चोरी करतानाचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

file photo
गुटखा पकडायला गेले अन् सस्पेंड झाले; पोलिसांवरच ही वेळ का आली? वाचा...

सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर तालुक्यात सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. गावात अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या भुरट्या चोरांना पोलिसी खाक्या दाखविण्याची गरज आहे. तरच विसरवाडीकर निर्धास्तपणे झोपू शकतील. तसेच गावात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com