नंदुरबारमध्‍ये विठ्ठल मंदिर बंद..भाविकांनी घेतले बाहेरूनच दर्शन

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचे संकंट उभे आहे. याची खबरदारी म्‍हणून आषाढीच्‍या पंढरपूर वारीला देखील परवानगी नाकारली आहे.
नंदुरबारमध्‍ये विठ्ठल मंदिर बंद..भाविकांनी घेतले बाहेरूनच दर्शन
विठ्ठल मंदिरविठ्ठल मंदिर

नंदुरबार : आषाढी एकादशी म्‍हटली की विठ्ठल– रुक्मिणी दर्शनाची ओढ भाविकांना असते. पंढरपूरची वारी करता आली नाही, तर गावातीलय विठ्ठल मंदिरात जावून दर्शन घेत असतात. यंदा मात्र कोरोनामुळे लागलेल्‍या निर्बंधामुळे नंदुरबारमधील मंदिर दर्शनासाठी बंद आहे; यामुळे भाविकांनी बाहेरूनच दर्शनच घेतले. (nandurbar-news-Vitthal-temple-closed-in-Nandurbar-but-Devotees-took-darshan-from-outside)

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचे संकंट उभे आहे. याची खबरदारी म्‍हणून आषाढीच्‍या पंढरपूर वारीला देखील परवानगी नाकारली आहे. शिवाय, मंदिर देखील दर्शनार्थ खुले ठेवण्याची परवानगी नाही. यामुळेच आषाढी असताना देखील विठ्ठल मंदिर बंदच आहेत.

विठ्ठल मंदिर
भाविकांविना पिंप्राळानगरी सुनी- सुनी; जागेवरच ओढला रथ

मंदिर परिसरात शुकशुकाट

आषाढी एकादशीनिमित्त नंदुरबार शहरातील पटेलवाडी येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची मोठी रीघ लागते. परंतु यंदा कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये; यासाठी पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त लावण्यात आला होता. श्रद्धाळू भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनच विठुरायाचे दर्शन घेत. विठ्ठला चरणी कोरोणाच्या संकटाचे निरासन होऊन सर्व भक्तांसाठी मंदिरे लवकर खुली व्हावी, सर्वांना भगवंतांचे दर्शन सूखा समाधानाने घेता यावे, चांगले आरोग्य मिळावे अशी प्रार्थना पांडुरंगाकडे केली.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com