अडीच हजाराची लाच घेताना कनिष्‍ठ सहाय्यक अडकला

अडीच हजाराची लाच घेताना कनिष्‍ठ सहाय्यक अडकला
अडीच हजाराची लाच घेताना कनिष्‍ठ सहाय्यक अडकला
bribe

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्‍या लघु सिंचन विभागातील कनिष्ठ सहाय्यकाला अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. (nandurbar-news-While-taking-bribe-of-two-and-half-thousand)

bribe
वर–वधूच्‍या मंडळींना धक्‍का; वधूचे दागिने काढायला सांगितले अन्‌

नंदुरबार जिल्हा परिषदेतील लघु सिंचन विभागात तक्रारदार यांनी केलेल्या कामाची रक्कम मिळावी; यासाठी कनिष्ठ सहाय्यकाकडे मागणी केली. यानंतर आरोपी कनिष्ठ सहाय्यक लोकसेवक गुप्तेश चंद्रकांत सुगंधी यांनी तक्रारदाराकडे बिल काढून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. आरोपीने सदर कामांच्या बिलामधून दहा टक्के अनामत रक्कमेतील अडीच हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ सायकलला रंगेहात पकडले.

ताब्‍यात घेतले

नंदुरबार जिल्हा परिषद लघुसिंचन कार्यालयात पंचा समक्ष रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com