Nandurbar News: ग्रामपंचायतीसमोरच हातभट्टयांची केली होळी; महिला बचत गट आक्रमक

ग्रामपंचायतीसमोरच हातभट्टयांची केली होळी; महिला बचत गट आक्रमक
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वडझाकन गावामध्ये दारूच्या व्यसनामुळे गावातील सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब होत आहे. यामुळे (Nandurbar News) महिला बचत गट सदस्यांनी गावात असलेले अवैध दारूचे दुकाने तसेच हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य जमा करून ग्रामपंचायत (Gram Panchayat) समोर जाळून होळी केली. वडझाकन गावात गेल्या २० ते २५ वर्षांपासून हातभट्टी दारूमुळे गावातील महिला त्रस्त झाले होत्या. (Tajya Batmya)

Nandurbar News
Jalgaon News: बैलांना पाणी पाजण्यासाठी गेला तो परतलाच नाही; धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

बचत गट महिला ग्रामपंचायत सभांमध्ये वारंवार तक्रार करत होत्या. पती दारू पिऊन मारहाण करतो, रोजंदारीचे आणलेले पैसे हिसकावून दारू पिऊन घरात धिंगाणा घालतात. शेतात पिकवलेले धान्य विकून दारूचे व्यसन करतात. आता तर काही गावातले तरुण मुलेही मद्यधुंद अवस्थेत फिरत आहेत. दारूमुळे अनेक महिलांचे संसार रस्त्यावर आले आहेत; अशी तक्रार लोकनियुक्त सरपंच अनिता वसावे यांच्याकडे महिलांनी केली.

१० ठिकाणातील साहित्य केले गोळा

सरपंच अनिता वसावे यांनी २६ जानेवारीच्या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी संध्याकाळी महिला ग्रामसभा घेऊन गावात दारूबंदीचा ठराव केला. ३१ जानेवारीनंतरपर्यंत अवैध दारू हातभट्ट्या बंदचा इशारा दिला होता. त्यानंतर १ फेब्रुवारीला अनिता वसावे यांच्या नेतृत्वाखाली ६० ते ७० बचत गट महिलांनी गावातील ९ ठिकाणी अवैध दारू हातभट्टी आणि एक अवैध बियर आणि कॉटर विकणारे दुकान अशा १० ठिकाणातील साहित्य गोळा करून आवारात आणून त्याची होळी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com