
नंदुरबार : खर्डी नदीमार्गे तळोदाकडे दुचाकीवर येताना झाड उन्मळुन पडले होते. या झाडाखाली दाबल्या गेलेल्या तरुणाचा आज उपचारादरम्यान अखेर मृत्यू (Death) झाला आहे. (nandurbar young man who was crushed under a tree died during treatment)
तळोदा (Taloda) तालुक्यातील मोहिदा गावचा रहिवाशी असलेल्या रविद्र गुलाब ठाकरे असे या तरुणाचे नाव आहे. वादळी वाऱ्यामुळे त्याच्यावर झाड कोसळल्याने झाडाखाली अडकलेल्या रविंद्रला बाहेर काढुन सुरुवातीला तळोदा आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र दुचाकीसह अंगावर भलेमोठे झाड पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तात्काळ मदत करणार
नैसर्गिक आपत्तीत रविंद्रचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्याला शासकीय नियमानुसार तात्काळ मदत करणार असल्याचे तळोदा तहसीलदार यांनी सांगितले असून त्याबाबतचे आदेश तहसिलदार तळोदा यांनी दिले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.