नंदुरबारमध्‍ये पोलिसांचा रूट मार्च
Nandurbar police

नंदुरबारमध्‍ये पोलिसांचा रूट मार्च

नंदुरबारमध्‍ये पोलिसांचा रूट मार्च

नंदुरबार : गणेश उत्सवानिमित्त नंदुरबार शहरात पोलीस प्रशासनातर्फे पथसंचलन करत रूट मार्च काढण्यात आला. सोमवारी साजरा होणारा पोळा व शुक्रवारी बाप्‍पाचे आगमन होण्यापुर्वी दक्षता म्‍हणून पोलिसांनी रूट मार्च काढला. (nandurbar-police-root-march-in-city-on-ganesh-festival)

आगामी पोळा सण व गणेश उत्सवानिमित्त नंदुरबार शहरात दंगा नियंत्रण पथका अंतर्गत पोलिसांची रंगीत तालीम घेण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे आदी वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांसह ९४ पोलीस कर्मचाऱ्यांनी पथसंचलनात भाग घेतला होता.

Nandurbar police
संघटनात्मक मोट बांधणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद; सुरज चव्हाण यांचा धुळे दौरा

या मार्गावरून काढला रूट मार्च

नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा- त्रिकोणी बिल्डिंग- घोडा पीर मशीद ईलाई चौक- मच्छी बाजार- जळका बाजार- दो शाह तकिया- देसाई पेट्रोल पंप- मोठा मारुती या मार्गावर पथ संचलन/रूट मार्च करण्यात आला. सण उत्सव काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी पोलीस प्रशासनातर्फे हा रूट मार्च घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com