Nandurbar: शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या सर्जा राजाचा बैलपोळा सण उत्साहात साजरा

बळीराजाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा शेतकऱ्यांसोबत राबराब राबणाऱ्या सर्जा राजाचा हा सण असल्याने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा पोळा सण नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Nandurbar: शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या सर्जा राजाचा बैलपोळा सण उत्साहात साजरा
Nandurbar: शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या सर्जा राजाचा बैलपोळा सण उत्साहात साजरादिनू गावित

दिनू गावित

नंदुरबार : बळीराजाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा शेतकऱ्यांसोबत राबराब राबणाऱ्या सर्जा राजाचा हा सण असल्याने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा पोळा सण नंदुरबार Nandurbar जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी बैलांना दिवस भर कुठल्याही प्रकारचे काम करण्यास लावले जात नाही.

हे देखील पहा-

बैलांना आंघोळ घालून शिगांना व अंगावर रंगरंगोटी करून शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना सजवून गावातील मारुती मंदिरात जाऊन पूजा केली जाते. मंदिराला पाच फेऱ्या मारून पूजा अर्चना केली जाते.

त्यामुळे आज बळीराजाने वर्षभर राबणाऱ्या बैलांची पूजा केली. आधुनिक शेती तंत्रामुळे गावातील बैलांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याचा घरात पुरणपोळीचे जेवण केल जातं. गावातील मंदिरातून घरी आल्यावर गृहिणीद्वारे बैलांना पुरणाचा नैवद्य दाखवून आरती करण्यात येते.

Nandurbar: शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या सर्जा राजाचा बैलपोळा सण उत्साहात साजरा
पुण्यातील त्या' दुष्कृत्यात 2 रेल्वे कर्मचारी आणि 6 रिक्षा चालकांचा समावेश!

पुरणपोळी व धान्य खाऊ घालण्यात येते, घरातील सदस्याप्रमाणे असलेल्या बैलांना घरी आणून त्यांची सेवा करून बैल पोळा सण साजरा करण्यात येतो. नंदुरबार जिल्ह्यात यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी असल्याने यंदा शेती पीक उत्पादनात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाच्या अखेरच्या महिन्यात समाधानकारक पाऊस होऊन पिक उत्पादनात शेतकरी व गुराढोरांना पाणी व चांगला चारा उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी बैलपोळा निमित्त व्यक्त केली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com