Shahada News : शासकीय आश्रम शाळा भाड्याच्या खोलीत; पन्नास वर्षानंतरही हक्काची जागा नाही

Nandurbar News : शासकीय आश्रम शाळा भाड्याच्या खोलीत; पन्नास वर्षानंतरही हक्काची जागा नाही
Shahada News
Shahada NewsSaam Tv

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : आश्रम शाळेत शिक्षण घेणारे मुले तेथेच वास्तव्यास राहत असतात. यात शासकीय आश्रम शाळा असल्यास सर्व सुविधा (Nandurbar) सरकार पुरवत असते. परंतु पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शासकीय आश्रम शाळेसाठी आदिवासी विकास विभाग आजपर्यंत हक्काची इमारत देऊ शकले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. (Shahada) शहादा तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेसाठी हे दुर्दैवच म्हणावे लागेल. (Live Marathi News)

Shahada News
Jalgaon News: बाप नव्हे हा तर हैवान! ८ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबली; घटनेत बाळाचा मृत्यू

सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते. मात्र त्या सुविधा सर्वसामान्यांना भेटता का नाही? हा एक मोठा प्रश्न आहे. आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्यावतीने शासकीय आश्रम शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पन्नास वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शासकीय आठवण काढायला ५० वर्षानंतर ही इमारत देण्यात राज्य शासन अपयशी आहे. (Ashram School) एकीकडे शिक्षणाचा कायदा केला गेला. मात्र भौतिक सुविधांच्या अभावी शिक्षण सुविधांपासून विद्यार्थी वंचित राहत असल्याचे चित्र आहे.  

Shahada News
Bogus Seeds: बियाणे कंपनीने केली शेतकऱ्याची फसवणूक; ८० दिवसातच निघाले धान

वन विभागाची जमीन हवी 

हजारो कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या आदिवासी विकास विभागाचावतीने शासकीय आश्रम शाळेला इमारत दिली जात नाही. राज्यातील अनेक आश्रम शाळा इमारतींच्या प्रतीक्षेत आहेत. शाळा प्रशासनाच्या वतीने शाळेच्या जमिनीसाठी वन विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली आहे. काही ठिकाणी वन विभागाचा जमिनीची समस्या आहे. मात्र राज्य सरकार आणि वनविभाग यांच्या समन्वयाने ही समस्या सुटू शकते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com