Nandurbar : खा. गावितांच्या पिंगाणे ग्रामस्थांचे आमरण उपोषण मागे!

साम टिव्हिच्या बातमीची दखल घेऊन आज खासदार डॉ.हिना गावित आणि आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी उपोषणाच्या ठिकाणी नागरिकांची भेट घेतली.
Nandurbar : खा. गावितांच्या पिंगाणे ग्रामस्थांचे आमरण उपोषण मागे!
Nandurbar : खा. गावितांच्या पिंगाणे ग्रामस्थांचे आमरण उपोषण मागे!दिनू गावित

नंदुरबार : शहादा तालुक्यातील पिंगाणे ग्रामस्थांचे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेलया आमरण उपोषणाबाबत साम टीव्हीने बातमी दाखवली होती. यात जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला होता. साम टिव्हिच्या बातमीची दखल घेऊन आज खासदार डॉ.हिना गावित आणि आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी उपोषणाच्या ठिकाणी नागरिकांची भेट घेतली.

हे देखील पहा :

पिंगाणे गावातील एकूण 78 कुटुंबांचे चुकीच्या पद्धतीने झालेले सर्वेक्षण पुन्हा सुधारित पद्धतीने करून तसा आदेश प्रशासनाने केंद्र सरकारला पाठवावा त्याचा पाठपुरावा मी करून नागरिकांना न्याय मिळवून देईल असे आश्वासन डॉ.हिना गावित यांनी पिंगाणे ग्रामस्थांना दिले.

Nandurbar : खा. गावितांच्या पिंगाणे ग्रामस्थांचे आमरण उपोषण मागे!
Nagpur Crime : नागपूरला झालंय तरी काय? सारख्याच होतायत हत्या!

यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावित, खासदार डॉ.हिना गावित यांनी नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रधानमंत्री आवास योजना मध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झालेले आहेत. खासदार गावित यांनी वारंवार स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com